NZ vs PAK: मोहम्मद रिझवानने मोडला केएल राहुलचा रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये केला मोठा पराक्रम!

NZ vs PAK: क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यातही पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून 7 गडी राखून पराभव झाला.
Mohammad Rizwan
Mohammad Rizwan Dainik Gomantak
Published on
Updated on

NZ vs PAK: क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यातही पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून 7 गडी राखून पराभव झाला. मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदीसारखे खेळाडू या सामन्यात चमकले, पण इतर खेळाडूंच्या खराब कामगिरीने पुन्हा एकदा संघाचे खराब प्रदर्शन पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या नाबाद 90 धावांच्या खेळीच्या जोरावर 158 धावा ठोकल्या. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना किवी संघाला शाहीन आफ्रिदीने 20 धावांत तीन गडी बाद करत मोठा धक्का दिला होता, परंतु असे असतानाही यजमान संघाने डॅरिल मिशेल (72*) आणि ग्लेन फिलिप्स (70) यांच्या 139 धावांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर विजय संपादन केला. 5 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान 0-4 ने पिछाडीवर आहे.

दरम्यान, आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मोहम्मद रिझवान न्यूझीलंडच्या भूमीवर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजचं बनला नाही तर त्याने केएल राहुलचा विक्रमही मोडला. याआधी न्यूझीलंडमध्ये यष्टीरक्षक म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर होता. 2020 मध्ये, त्याने यजमान संघाविरुद्ध 89 धावांची खेळी खेळली होती.

Mohammad Rizwan
NZ vs PAK: पाकिस्तानची उडाली दाणादाण! शाहीन आफ्रिदीचं नेतृत्व फेल; न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा सामना गमावला

न्यूझीलंडमध्ये पाहुण्या यष्टीरक्षकाने केलेल्या सर्वाधिक धावा

मोहम्मद रिझवान - 63 चेंडूत नाबाद 80, क्राइस्टचर्च 2024

मोहम्मद रिझवान - 59 चेंडूत 89 धावा, नेपियर 2020

कुसल मेंडिस - 48 चेंडूत 73 धावा, क्वीन्सटाउन 2023

केएल राहुल – 50 चेंडूत 57, ऑकलंड 2020

दरम्यान, यष्टीरक्षक म्हणून रिझवान या बाबतीत केएल राहुलला मागे टाकत न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. राहुलने किवींच्या घरी 5 डावात 56 च्या सरासरीने 224 धावा केल्या आहेत, तर रिझवानने या डावानंतर न्यूझीलंडमध्ये 272 धावा केल्या आहेत.

Mohammad Rizwan
NZ vs PAK: रिझवान बॅट सटकली, तरी धावला, पण क्रीज लाईनला हात लावण्यापासून काही सेंटीमीटरने हुकला

न्यूझीलंडमध्ये पाहुण्या यष्टीरक्षक फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा-

मोहम्मद रिझवान- 272

केएल राहुल- 224

सर्फराज अहमद- 123

कुसल मेंडिस- 108

मॅथ्यू वेड- 99

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com