Novak Djokovic tears shirt with roar during celebration, but Carlos Alcaraz cries after Cincinnati Masters final:
रविवारी (20 ऑगस्ट) सिनसिनाटी ओपन या एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात दिग्गज नोवाक जोकोविचने 20 वर्षीय कार्लोस अल्कारेजचा पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. यानंतर कोर्टवर दोन विरुद्ध भावनांचे दर्शन टेनिस चाहत्यांना झाले.
अंतिम सामन्यात जोकोविचने 5-7, 7-6 (7), 7-6 (4) अशा फरकाने तीन सेट विजय मिळवला. हा अंतिम सामना तब्बल 3 तास 49 मिनिटे चालला. त्यामुळे एटीपी मास्टर्स स्पर्धेतील सर्वाधिक काळ चालणाऱ्या अंतिम सामन्यांपैकी हा एक सामना ठरला. तसेच हे जोकोविचसाठी विक्रमी 39 वे एटीमी मास्टर्स 1000 चे विजेतेपद ठरले.
दरम्यान, तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच आणि अल्कारेज या दोघांनाही सामना जिंकण्याची संधी होती. पण यात जोकोविचने बाजी मारली आणि विजेतेपद जिंकले. हे विजेतेपद जिंकल्यानंतर जोकोविच आणि अल्कारेजला भावना अनावर झाल्या होत्या. जोकोविचच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता, तर अल्कारेजच्या डोळ्यात अश्रू होते.
जोकोविचने जिंकल्यानंतर त्याचा शर्ट फाडून जोरात डरकाळी फोडत विजयाचे सेलिब्रेशन केले, तर त्याचवेळी अल्कारेज मात्र कोर्टवरील सोफ्यावर बसून टॉवेलने तोंडू झाकून रडताना दिसला. या क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, असे असले, तरी अल्कारेज ज्या प्रकारे त्याचे टेनिस खेळत आहे, त्याबद्दल सामन्यानंतर जोकोविचने त्याचे कौतुक केले आहे.
याचवर्षी जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचला अल्कारेजने पराभूत केले होते.
अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 अशा पाच सेटमध्ये पराभूत करत कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले होते. पण या पराभवानंतर एक महिन्यातच जोकोविचने अल्कारेजला पराभवाचा धक्का देत एकप्रकारे विम्बल्डन पराभवाचा वचपाच काढला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.