CWG रौप्यपदक विजेता भालाफेकपटू अँडरसन पीटर्सवर पाच जणांनी हल्ला करून बोटीतून फेकले- Video

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स या भालाफेकपटूवर अज्ञातांनी हल्ला केला आहे.
Anderson Peters
Anderson Peters Dainik Gomantak
Published on
Updated on

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स (Anderson Peters) या भालाफेकपटूवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. पीटर्स क्रूझवर होता, ज्यावर पार्टी सुरू होती, त्यादरम्यान पाच जणांनी त्याला मारहाण करून बोटीतून खाली फेकले. ही घटना बुधवारी घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 24 वर्षीय अँडरसन पीटर्सला पाच जण मारहाण करताना दिसून येत आहे. मारहाणीवेळी त्याला बोटीतून बाहेर फेकण्यात आले आहे. ग्रॅनाडा ऑलिम्पिक समितीने दिलेल्या माहितीनुसार पीटर्सवर सध्या उपचार सुरू आहेत. (CWG silver medalist javelin thrower Anderson Peters attacked by five men and thrown from boat Video)

Anderson Peters
Rohit Sharma च्या नावावर नवा विक्रम, धोनीलाही टाकले मागे

इनसाइड द गेम्सनुसार, रॉयल ग्रॅनाडा पोलिस दल कॉमनवेल्थ स्पर्धेतील रौप्यपदक विजेता पीटर्स वेले याच्यावरील हल्ल्याचा तपास करत आहे आणि बोटचे क्रू सदस्य यासाठी तपासात मदत करत आहेत.

ग्रॅनाडा ऑलिम्पिक समितीने गुरुवारी एक निवेदन जारी करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. आम्ही त्याच्या निट होण्यासाठी समर्थन करत आहोत आणि ह्या प्रकरणाचे लवकर समाधान मिळेल याची आशा करतो, असे निवेदनात म्हटले आहे. 24 वर्षीय पीटर्सने जुलैमध्ये युजीनमध्ये 90.54 मीटर थ्रो करून, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राच्या 88.13 च्या सर्वोत्तम प्रयत्नांना मागे टाकत विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.

Anderson Peters
'द वॉल' ला ब्रेक; झिम्बाब्वे दौऱ्यावर VVS Laxman टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर अँडरसन पीटर्स मंगळवारी ग्रॅनडाला परतला होता. पीटर्स देशात परतल्यावर त्यांचे जोरदार स्वागत झाले. विद्यमान विश्वविजेत्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 88.64 च्या सर्वोत्तम प्रयत्नांसह दुसरे स्थान पटकावले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 90.18 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह सुवर्ण जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com