Year Ending 2022: विराट, रोहित नव्हे तर भारतात 2022 या वर्षात 'हा' खेळाडू झाला सर्वाधिक सर्च

फिफा वर्ल्डकपपेक्षाही आयपीएल स्पर्धा झाली सर्वाधिक सर्च
Pravin Tambe 
Pravin Tambe Dainik Gomantak
Published on
Updated on

Year Ending 2022: क्रिकेट हा भारताचा जिव्हाळयाचा विषय आहे. त्यामुळेच भारतातील अनेकांसाठी क्रिकेट हा जणू धर्मच असतो आणि क्रिकेटर्स हे देव. अर्थातच देशात क्रिकेटला मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे. दरवर्षी क्रिकेटबाबत इंटरनेटवर विविध गोष्टी मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जात असतात. आताही 2022 या वर्षात देशात कोणती स्पर्धा, कोणता खेळाडू सर्वाधिक सर्च केला गेला, याविषयीची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

(Most Searched Indian Cricketer In year 2022)

Pravin Tambe 
Year Ending 2022: 'या' खेळाडुंनी 2022 मध्ये क्रिकेटला म्हटले अलविदा

देशात सध्या विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव हे टॉप क्रिकेटर्स असले तरी यावर्षी सर्वाधिक सर्च झालेला क्रिकेटर यापैकी कुणीही नाही. आश्चर्य वाटु शकेल, पण यंदाच्या वर्षात सर्वाधिक सर्च झालेला क्रिकेटर ठरला आहे प्रवीण तांबे.

एरवी ज्या वयात क्रिकेटर्स निवृत्ती घेतात, किंवा क्रिकेट खेळणे थांबवतात त्या वयात प्रवीण तांबे याने क्रिकेटमध्ये पदापर्ण केले होते. प्रवीण तांबे याने वयाच्या 41 वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. याच वर्षी प्रवीण तांबेचा बायोपिक 'कौन प्रवीण तांबे?' रीलीज झाला होता. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

या वर्षात भारतात सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू

प्रवीण तांबे

देवाल्ड ब्रेविस

रजत पाटीदार

उमरान मलिक

राफेल नदाल

टीम डेव्हिड

डिवॉन कॉनवॉय

मिताली राज

अर्शदीप सिंग

कुलदीप सेन

Pravin Tambe 
Year Ending 2022: कॅप्टन्सी, मोठ्या स्पर्धा अन् दबाव! 1000 धावाही 'कॅप्टन' हिटमॅनसाठी...

भारतात सर्वाधिक सर्च झालेले स्पोर्ट्स इव्हेंट

आयपीएल

फिफा वर्ल्ड कप

आशिया कप

टी-20 वर्ल्ड कप

कॉमनवेल्थ गेम

इंडियन सुपर लीग

प्रो कबड्डी लीग

आयसीसी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलियन ओपन

विम्बल्डन

परदेशी खेळाडू

भारतात सर्वाधिक सर्च झालेले परदेशी खेळाडू देवाल्ड ब्रेविस ठरला आहे. तर त्यानंतर राफेल नदाल दुसऱ्या स्थानी आहे. दरम्यान, भारतात या वर्षी सर्वाधिक सर्च झालेल्या आयपीएल लढतींमध्ये एक नंबरवर चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स ही लढत आहे. तर दोन नंबरवर लखनौ सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स ही लढत आहे.

भारतातील क्रिकेट मालिका

भारतीय क्रिकेट संघ देशात ज्या परदेशी संघांविरोधात खेळला त्यात सर्वाधिक सर्च झालेला दौरा ठरला इंडिया विरूद्ध इंग्लंड. त्यानंतर साऊथ आफ्रिकेविरोधातील दौरा, त्यानंतर वेस्टइंडिज विरूद्धचा त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दौऱ्याचा क्रमांक आहे.

इतर देशांमधील क्रिकेट मालिका

याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या विविध संघांच्या लढतींमधील कोणते सामने भारतात सर्वाधिक सर्च केले गेले, ते पाहुया. यात श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान या मालिकेतील सामने भारतात सर्वाधिक सर्च केले गेले. त्याखालोखाल इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान, श्रीलंका विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान, साऊथ आफ्रिका विरूद्ध इंग्लंड या मालिकांचा क्रमांक लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com