Blind Cricket: दृष्टीबाधितांच्या क्रिकेट स्पर्धेत उत्तर गोवा संघ विजयी

दिव्यांगजन आयोगाने आयोजित केली होती स्पर्धा
Blind Cricket Competition
Blind Cricket CompetitionDainik Gomantak

Blind Cricket: महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्य दिव्यांगजन आयोगातर्फे आयोजित जिल्हास्तरीय दृष्टीबाधित क्रिकेट स्पर्धेत उत्तर गोवा संघ विजयी ठरला आहे.

Blind Cricket Competition
Digambar Kamat: ज्याच्या कडे आकडा त्याचीच सत्ता, हीच खरी लोकशाही!
Blind Cricket Competition
Blind Cricket CompetitionDainik Gomantak

या स्पर्धेचे उद्घाटन ईडीसी अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या हस्ते झाले. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक तसेच सुकूर, साल्वादोर द मुंद आणि पेन्हा दे फ्रांस पंचायतचे सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते.

Blind Cricket Competition
Green Crackers in Goa: गोव्यातही हरित फटाक्यांचा वापर करण्याचा विचार

अंतिम सामन्यात उत्तर गोवा संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि उत्तर गोवा संघाने तीन विकेटांनी बाजी मारली. राज्य दिव्यांगजन आयोगाने हा सामना आयोजित केल्याबद्दल खेळाडूंनी आभार व्यक्त केले.

या सामन्याविषयी बोलताना दृष्टीबाधित खेळाडू म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकारच्या सामन्याची आम्ही वाट पाहत होतो. खूप दिवसानंतर आम्हाला खेळण्याची संधी मिळाल्याने आणि सर्वांना खूप आनंद झाला आहे".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com