FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप मैदानातील कामगिरीबरोबरच अनेक गोष्टींच्या विरोधातील निदर्शनांमुळेही चर्चेत आहे. नुकताच सोमवारी झालेल्या पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे सामन्यादरम्यान एक व्यक्ती मैदानात धावत आला होता, ज्याच्या सुपरमॅनच्या टी-शर्टवर संदेश लिहिलेला होता आणि हातात रेनबो फ्लॅग होता.
हा प्रेक्षक साधारण ३० सेकंदासाठी मैदानात होता. तो मैदानात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि मैदानातून बाहेर घेऊन गेले. त्यावेळी त्याच्या हातातील रेनबो फ्लॅग खाली पडला. त्यानंतर तो फ्लॅग रेफ्रीने उचलून मैदानाच्या बाहेर ठेवून दिला. तिथे लगेचच एक कामगार येऊन तो फ्लॅग घेऊन गेला. रेनबो फ्लॅग हा समलिंगी समुदायाला (LGBTQ समुदाय) समर्थन देण्यासाठी वापरला जातो.
तसेच या प्रेक्षकाने त्याच्या टी-शर्टवर 'युक्रेनला वाचवा' (Save Ukraine) असे पुढच्या बाजूला लिहिले होते आणि मागील बाजूस 'इराणी महिलांना सन्मान द्या (Respect for Iranian Women), असे लिहिले होते.
या प्रेक्षकाला मैदानातून बाहेर नेल्यानंतर त्याच्यावर कोणती कारवाई झाली की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार हा प्रेक्षक इटलीचा असल्याचे समजले आहे.
दरम्यान, कतारमध्ये लैंगिकतेबद्दल भाष्य करण्याबाबत अनेक कडक नियम आहेत. त्यामुळे याआधी काही युरोपियन कर्णधारांनाही वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) सामन्यादरम्यान 'वन लव्ह', असा संदेश लिहिलेला आर्मबँड घालण्यासही नकार देण्यात आलेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.