AUS vs NZ: बापरे! ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला, मात्र स्टार्क तब्बल 23 सामन्यानंतर...

Mitchell Starc: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असला, तरी स्टार्कला एकही विकेट न मिळाल्याने त्याच्या एका विक्रमात खंड पडला.
Pat Cummins and Mitchell Starc
Pat Cummins and Mitchell Starc

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs New Zealand, Mitchell Starc:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात अत्यंत चुरशीचा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 5 धावांनी विजय मिळवला. पण याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला एकही विकेट न मिळाल्याने त्याच्या एका विक्रमात खंड पडला.

स्टार्कसाठी हा वनडे वर्ल्डकपमधील 24 वा सामना होता. त्याने सर्वात आधी 2015 साली पहिला वर्ल्डकप सामना खेळला होता. तेव्हापासून सलग 23 सामन्यात स्टार्कने कमीत कमी एक तरी विकेट घेतलीच आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सलग 23 सामन्यात विकेट घेणारा तो पहिला आणि एकमेव गोलंदाज आहे. मात्र, त्याची ही विकेट घेण्याची साखळी अखेर शनिवारी तुटली. त्याला न्यूझीलंडविरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. त्याने 9 षटके गोलंदाजी करताना 89 धावा दिल्या.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग डावात विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्क अव्वल क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा आहे. मॅकग्राने 2003 आणि 2007 वर्ल्डकपमध्ये मिळून सलग 13 डावात किमान एकतरी विकेट घेतली होती.

Pat Cummins and Mitchell Starc
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी रोमांचक विजय! न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव

दरम्यान, स्टार्कने वनडे वर्ल्डकपमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी न्यूझीलंडविरुद्धच ऑकलंडला 2015 वर्ल्डकपमध्ये नोंदवली होती. त्याने त्या सामन्यात तब्बल 6 विकेट्स घेतल्या होत्या. स्टार्कने आत्तापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या 24 सामन्यात 18.37 षटकात 56 विकेट्स घेतल्या आहेत.

तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्यासह लसिथ मलिंगाही 56 विकेट्ससह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने 71 विकेट्स घेतल्या आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मुथय्या मुरलीधरनने 68 विकेट्स घेतल्या आहेत.

Pat Cummins and Mitchell Starc
World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध रोमांचक विजयानंतर द. आफ्रिका 'नंबर वन'! जाणून घ्या टॉप-4 मधील संघ

ऑस्ट्रेलियाचा रोमांचक विजय

शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्वबाद 388 धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 109 धावांची खेळी केली, तर डेव्हिड वॉर्नरने 81 धावा केल्या. याबरोबरच ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 50 षटकात 9 बाद 383 धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने 116 धावांची शतकी खेळी केली. तसेच जिमी निशमने 58 धावांची आणि डॅरिल मिचेलने 54 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com