World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होऊनही झुंजार न्यूझीलंडने रचला विक्रम!

Australia vs New Zealand: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतरही न्यूझीलंडच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
Australia vs New Zealand
Australia vs New Zealand
Published on: 
Updated on: 

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs New Zealand:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (28 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना झाला. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 50 षटकात 9 बाद 383 धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

Australia vs New Zealand
World Cup 2023: द. आफ्रिका - पाकिस्तान सामन्यात DRS चा सावळा गोंधळ, ICC नेही मान्य केली चूक

वनडे वर्ल्डकपमध्ये पराभव झालेल्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. हैदराबादमध्ये याच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 18 दिवसांपूर्वी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध 9 बाद 344 धावा उभारूनही पराभव स्विकारला होता.

त्याआधी २०१९ वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पाकिस्तानविरुद्ध 333 धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला होता.

वनडे वर्ल्डकप सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारणारे पराभूत संघ -

383/9 - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, धरमशाला, 2023

344/9 - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, हैदराबाद, 2023

334/9 - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, नॉटिंगघम, 2019

333/9 - बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नॉटिंगघम, 2019

327/8 - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, बंगळुरू, 2011

Australia vs New Zealand
World Cup 2023: बापरे! टीव्हीवर 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिले सामने, 2019 पेक्षा 43 टक्क्याने वाढ

ऑस्ट्रेलियाचा रोमांचक विजय

शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्वबाद 388 धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 109 धावांची खेळी केली, तर डेव्हिड वॉर्नरने 81 धावा केल्या. याबरोबरच ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने 116 धावांची शतकी खेळी केली. तसेच जिमी निशमने 58 धावांची आणि डॅरिल मिचेलने 54 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.