टोकियो: ऑलिंपिक (Olympics) क्रीडानगरीत दाखल झाल्यापासून नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रात्रीची शांत झोप हवी होती. युरोप आणि जपानच्या (Japan) वेळेतील फरक, पात्रतेची भल्या पहाटेची वेळ, त्यातच चाचणी यामुळे नीरजला टोकियोत शांत झोपच लागली नव्हती. ऑलिंपिक सुवर्णपदक (Olympic gold medal) जिंकल्यानंतर आता शांत झोप लागेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती.
मी स्वीडनहून थेट टोकियोत आलो. त्यामुळे बदलेल्या वेळेशी जुळवून घेण्यात वेळ जाणार होता. खरे तर टोकियोत आलो, त्या वेळी रात्री उशिरा झोपून उशिरा उठण्याचे ठरविले होते; पण काही दिवसांपासून उत्तेजक चाचणीसाठी पहाटे उठवले जात होते, असे नीरजने सांगितले.
भालाफेकीच्या स्पर्धेसाठी क्रीडानगरीतून स्टेडियमपर्यंतचा प्रवास नीरज कधीही विसरणार नाही. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना घेऊन जाणारी बस स्टेडियमला निघाली आणि काही वेळातच पाकिस्तानचा अर्शद नदीम नीरजकडे आला. त्याच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे एकत्रित छायाचित्र दाखवले. त्याने आपल्या दोघातील स्पर्धेची पाकिस्तानात अब्दुल खलीक आणि मिल्खा सिंग यांच्यातील स्पर्धशी तुलना करतात, असे सांगितले. ही आठवण टोकियोतील निवडक पत्रकारांना सांगताना नीरज भावूक झाला. मिल्खा सिंग यांचे निधन झाले, त्या वेळी मी खूप निराश झालो. ऑलिंपिक पदकासह त्यांची भेट घेण्याची इच्छा होती; पण ती पूर्ण झाली नाही, असे तो म्हणाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.