टोकियो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympics) सांगता समारंभ आज पार पडला. कोरोनाचे अनेक नियम पळत या वेळेसची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारतातर्फेही नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकमध्ये सुवर्णपदक(Gold Medal) जिंकत आपला शेवट 'गोल्ड ' केला. भारताने यावर्षी एकूण सात पदके जिंकत आता पर्यंतची ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या अगोदर 2012 मध्ये लंडन मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वाधिक सहा पदके मिळाली होती ज्यात दोन रोप्य (Silver Medal) तर चार कांस्यपदकांचा (Bronze Medal) समावेश होता मात्र यात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली होती मात्र यावेळी सुवर्ण पदकही जिंकत आपल्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि चार कांस्यपदकं जिंकत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली. (Tokyo Olympics: List of Indians who made India proud at the sporting event)
भारतातर्फे नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपद जिंकत देशाचे १३ वर्षानांतर देशाचे सुवर्ण स्वप्न साकार केलं.रवी कुमार दहियाने कुस्तीत रौप्य पदक तर बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकत अनुक्रमे दोन पादकांवर शिक्कामोर्तब केला. उरलेल्या तीन पादकांवर आपले नाव कोरले ते देशाच्या खऱ्या सोनेरी लक्ष्मीने . पदके जिंकण्याची चंदेरी सुरुवात करत मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये देशाला यावर्षीचे पहिले रौप्यपदक मिळवून दिले.त्यानंतर बॅडमिंटनमध्ये पी. व्ही.सिंधूने कांस्यपदक तर लावलीना बोरगोहेन हिने बॉक्सिंग मध्ये कांस्यपदक मिळवून दिले. तर एक पदक आले ते जवळपास ४१ वर्षानंतर देशासाठी सुवर्णक्षण घेऊन पुरुष हॉकी संघाने जर्मनीला नमवत या सामन्यात कांस्यपदक मिळवत इतिहास रचला.
1. नीरज चोप्रा- सुवर्णपदक विजेता
भालाफेक मध्ये ऑलम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुसरा भारतीय आहे.तीन वर्षांपासून ऑलम्पिकमध्ये पदकाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात होते आणि काल त्याने आपली हीच दावेदारी खरी ठरवत 87.58 मीटरच्या थ्रोसह ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताला ऑलम्पिक पदक मिळवून दिले.या अगोदरही नीरजने देशाला 2016 जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि 2018 राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक मिळवले होते. तसेच नीरज भारतीय लष्करातही सेवेसाठी आहे. मूळचा हरियाणाचा असलेल्या नीरजचे पूर्वज पानिपतच्या युद्धात देशासाठी प्राण पणाला लावून लढले होते.
2. मीराबाई चानू- देशाला यावर्षीचे पहिले पदक मिळवून देऊन आशेचा किरण दाखवणारी
मुळ मणिपूरची असलेली मीराबाई चानू (Meerabi Chanu) हिने 49 किलो वर्गात रौप्य पदक जिंकून वेटलिफ्टिंगमधील पदकाचा 21 वर्षाचा दुष्काळ संपवला.आणि देशाला यावर्षीचे पहिले पदक मिळवून देत आशेचा नवीन किरण जागवला.
इम्फाळपासून जवळपास 20 किमी अंतरावरील नोंगपोक काकजिंग गावात राहणारी मीराबाई घरात इतर भावंडांपेक्षा सर्वात छोटी आहे. खरेतर तिला तिरंदाज बनायचे होते. परंतु मणिपुरची दिग्गज वेटलिफ्टर कुंजरानी देवीबाबत वाचल्यानंतर तिने या खेळात भाग घेण्याचे ठरवले.
3. पी.व्ही. सिंधु - ऑलम्पिकमध्ये दोन पदकं जिंकत इतिहास रचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
पी.व्ही. सिंधुने (P.V.Sindhu)याही वर्षी चांगली कामगिरी करत ऑलम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यावर्षी संधूने कांस्यपदक तर 2016 रियो ऑलम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकले होते.
आपल्या या सिंधूने 2014 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप, आशियाई खेळ, राष्ट्रमंडळ खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4. लवलीना बोरगोहेन- ऑलम्पिकच्या पदार्पणातच पदकावर नाव कोरणारी खेळाडू
आसामची लवलीनाने (Lovlina Borgohain) आपल्या पहिल्या ऑलम्पिकमध्येच कांस्य पदक जिंकूत तिने इतिहास रचला.विजेंदर सिंह आणि मेरीकोम नंतर बॉक्सींगमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. 69 किग्रॅ वर्गात चीनी तायपेची माजी जागतिक चॅम्पियन निएन-शिन चेनला मात दिली.मत देत पदकावर आपले नाव कोरल.
5. बजरंग पूनिया- कुस्तीचा फड गाजवणारा कांस्यपदक विजेता
लहानपणापासूनच कुस्ती खेळणार्या बजरंग पुनियाला (Bajrang Puniya) सुवर्ण पदकाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात होते मात्र तो सेमीफायनलमध्ये पराभूत झाला पण बजरंगाने आपले नाव शेवटी कांस्यपदकावर कोरलेच.
६. रवि दाहिया- रजत पदक जिंकणारा भारताचा पैलवान
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावात जन्मलेल्या २३ वर्षीय ग्रॅपलरने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जरी, त्याने रौप्यपदक मिळवले, त्याची अफाट ताकद आणि तग धरण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्याने सर्वांना प्रभावित केले.2019 जागतिक चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकून ऑलम्पिकचे तिकिट पक्के केले आणि नंतर 2020 मध्ये दिल्लीत आशियाई चॅम्पियनशिप जिंकली होती.
7. पुरुष हॉकी टीम - 41 वर्षांनंतरचा हॉकीतला सुवर्णक्षण
हॉकीच्या कांस्य पदकाच्या लढतीत भारताने इतिहास रचत विजय मिळवला. जवळपास ४१ वर्षानंतर देशासाठी सुवर्णक्षण घेऊन पुरुष हॉकी संघाने जर्मनीला नमवत या सामन्यात कांस्यपदक मिळवत इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत जगज्जेत्या जर्मनीला नमवल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.