U19 Women's T20 WC: 'सेलिब्रेटी बनल्यावर लक्षात ठेवा...', नीरज चोप्राचा टीम इंडियाला बहुमोल सल्ला

19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपचा फायनल सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे मार्गदर्शन लाभले आहे.
Neeraj Chopra motivate U19 India women Team
Neeraj Chopra motivate U19 India women TeamDainik Gomantak

U19 India Women Team: रविवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाला पहिल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळायचा आहे. पॉचेफस्ट्रूम येथे होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतासमोर 19 वर्षांखालील इंग्लंडच्या महिला संघाचे आव्हान आहे.

पण या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्याने शनिवारी भारतीय संघाला भेट दिली होती. तो संघाला प्रोत्साहन देत असतानाचा एक व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की नीरजने त्याच्या समोर बसलेल्या भारतीय संघातील युवा महिला क्रिकेटपटूंना सांगितले की 'दबाव घेऊ नका. कारण याच गोष्टी नंतर लक्षात राहातात. खेळाचा आनंद घ्या. तुमचे 100 टक्के योगदान द्या आणि तुम्ही ते देतच आहात. तुमचे प्रशिक्षकही तुम्हाला चांगली मदत करत आहेत. तुमची हीच मानसिकता ठेवा.'

(Neeraj Chopra motivate U19 India women Team ahead of U19 Women's T20 World Cup Final)

Neeraj Chopra motivate U19 India women Team
U19 Women's T20 WC: बर्थडे गिफ्ट म्हणून 'ती' एकच गोष्टच पाहिजे, शफालीची टीम इंडियाकडे स्पेशल मागणी

नीरज पुढे म्हणाला, 'मी पण जेव्हा खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी पण एका सर्वसामान्य कुटुंबातीलच होतो. गावातून नंतर बाहेर गेलो. मलाही वाटते की तुम्हालाही अशी संधी आहे की तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवू शकता.'

'यावेळेचा सदुपयोग करा. जेवढी मेहनत करायची आहे, जो संघर्ष करावा लागेल, त्या सर्व गोष्टींसाठी तयार राहा. आपण आपल्या देशाकडून खेळतोय, हीच सर्वात मोठी प्रेरणा आहे. आपला एवढा मोठा देश आहे, तुमच्यासारखे अनेक खेळाडू आहेत. पण तुम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली आहे, ही मोठी प्रेरणा आहे.'

तसेच तो म्हणाला, 'मला एखाद्या गोष्टीसाठी खूप ट्रेनिंग करायची आहे आणि माझ्या देशाचा झेंडा अभिमानाने फडकवायचा आहे, ही प्रेरणा असायला हवी. तुम्ही सेलिब्रेटी बनाल, तेव्हा सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही खेळायला का सुरुवात केली. तुमची पार्श्वभूमी काय होती.'

Neeraj Chopra motivate U19 India women Team
U19 Women's T20 WC: कॅप्टन शफालीचा बड्डे अन् 'गोल्डन बॉय'ची उपस्थिती; सेलिब्रेशनचा Video Viral

तसेच नीरजला भारतीय संघाची जर्सीही यावेळी भेट म्हणून देण्यात आली. त्याने ती जर्सी घालून भारतीय खेळाडूंबरोबर फोटोही काढले. तसेच शनिवारी भारतीय संघाची कर्णधार शफालीचा 19 वा वाढदिवस असल्याने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही तो सहभागी झाला होता.

दरम्यान पहिल्यांदाच होत असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला अंतिम सामना खेळण्याचा मान भारत आणि इंग्लंड या संघांना मिळाला आहे. हा अंतिम सामना रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.15 वाजता सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com