U19 Women's T20 WC: बर्थडे गिफ्ट म्हणून 'ती' एकच गोष्टच पाहिजे, शफालीची टीम इंडियाकडे स्पेशल मागणी

शफली वर्माने तिच्या 19 व्या वाढदिवसानिमित्त 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाकडून खास गिफ्टची मागणी केली आहे.
Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak

U19 India Women Team: दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील महिला वर्ल्डकप खेळण्यात येत आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला विरुद्ध 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघांमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची कर्णधार शफाली वर्माने तिच्या संघसहकाऱ्यांकडून वाढदिवसानिमित्त खास मागणी केली आहे.

शफलीने शनिवारी (28 जानेवारी) तिचा 19 वा वाढदिवस साजरा केला. तिने हा वाढदिवस वर्ल्डकपदरम्यान 19 वर्षांखालील संघसकाऱ्यांबरोबर साजरा केला होता. ती या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही करत आहे. दरम्यान, तिने तिच्या या वाढदिवसाची भेट म्हणून वर्ल्डकप ट्रॉफी हवी आहे, असे संघसहकाऱ्यांना सांगितले आहे.

याबद्दल क्रिकइन्फोशी बोलताना तिने सांगितले की 'जेव्हा मी या 19 वर्षांखालील संघाशी जोडले गेले, तेव्हा मी त्यांना सांगितले होते की मला माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून फक्त वर्ल्डकप ट्रॉफी हवी आहे. मी यापेक्षा आणखी काही मागणार नाही. वाढदिवसाची फार काही तयारी नाही. फक्त दिवसाची मजा घेणार आहे. जर घरी असते, तर हा दिवस वेगळ्याप्रकारचा असता.'

(Only Birthday Gift I Want Is World Trophy says U19 India Women captain Shafali Verma)

Shafali Verma
U19 Women's T20 WC: कॅप्टन शफालीचा बड्डे अन् 'गोल्डन बॉय'ची उपस्थिती; सेलिब्रेशनचा Video Viral

दरम्यान, शफालीने असेही सांगितले की या वर्ल्डकपसाठी भारतीय खेळाडूंची चांगली मेहनत घेतली आहे. तसेच इंग्लंड जरी चांगले प्रतिस्पर्धी असले, तरी तिचा भारतीय संघावर विश्वास आहे.

शफाली म्हणाली, 'अंतिम सामन्यात पोहचण्याचा आनंद आहे. आता फक्त प्रत्येकाने त्यांचे 100 टक्के योगदान द्यावे, असे वाटते. मी जे पाहिले आहे, त्यावरून इंग्लंडकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. पण आम्ही आमची जी क्षमता आहे, त्याला पाठिंबा देऊ. आम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही.

'त्यांनीही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, म्हणजेच त्यांनीही योग्य गोष्टी केल्या आहेत. आम्हाला फक्त आमची जी ताकद आहे, त्याला पाठिंबा देण्याची आणि एकमेकींच्या कामगिरीचा आनंद घेण्याची गरज आहे. आम्ही एकमेकींना मैदानात पाठिंबा देत राहू.'

Shafali Verma
U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांची फायनलमध्ये धडक! न्यूझीलंडचा दारूण पराभव

शफालीने संघात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूला त्यांची भूमिका स्पष्टपणे समजवण्याचे श्रेय भारतीय संघाची प्रशिक्षक नुशिन अल खादीरलाही दिले आहे.

आयसीसीचा हा 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप यंदा पहिल्यांदाच खेळवण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्याच पर्वात भारत आणि इंग्लंडला अंतिम सामना खेळण्याचा मान मिळाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना पॉचेफस्ट्रूम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.15 सामना सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com