IPL 2023 Video: नवीनचा मुंबईविरुद्ध कहर! हिटमॅनसह 4 फलंदाजांना केलं आऊट, हटके सेलिब्रेशनचीही चर्चा

मुंबई इंडियन्सविरुद्ध चार विकेट्स घेत नवीनने शानदार योगदान दिले, पण सध्या त्याच्या सेलिब्रेशनची चर्चा अधिक होत आहे.
Naveen-Ul-haq | Rohit Sharma
Naveen-Ul-haq | Rohit Sharma Dainik Gomantak

Naveen-Ul- Haq Celebration after taking Wicket: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एलिमिनेटरचा सामना होत आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने शानदार गोलंदाजी केली.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही आक्रमक सुरुवात केली होती. पण कृणालने चौथ्या षटकात नवीन-उल-हककडे चेंडू सोपवला.

Naveen-Ul-haq | Rohit Sharma
IPL 2023: गेल्यावर्षी 9 वा क्रमांक, पण यंदा थेट फायनलमध्ये! CSK च्या 'परफेक्ट कमबॅक'ची 5 कारणे

नवीननेही हा विश्वास सार्थ ठरवत रोहित शर्माला 11 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर ईशानला यश ठाकूरने बाद केले. पण नंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यातील भागीदारी रंगली होती. त्यांची 66 धावांची अर्धशतकी भागीदारीही झाली.

असे असताना 11 व्या षटकात पुन्हा नवीन गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (33) आणि अखेरच्या चेंडूवर ग्रीनला (41) बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. यानंतर मात्र, मुंबईची धावांच्या गतीला लगाम लागला होता.

नवीनने 18 व्या षटकात धोकादायक ठरू शकणाऱ्या तिलक वर्मालाही 26 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे त्याने या सामन्यात एकूण 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईच्या आक्रमक सुरुवातीला नंतर लगाम लागला.

नवीनच्या सेलिब्रेशनचीही चर्चा

नवीन गेल्या दोन सामन्यांमध्ये महागडा ठरला होता. त्याच्याविरुद्ध फलंदाजांनी मोठ्या धावा काढल्या होत्या. मात्र या सामन्यात त्याने चांगले पुनरागमन केले. दरम्यान, त्याने या सामन्यात विकेट्स घेतल्यानंतर कानांत बोट घालत सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

काही सोशल मीडिया युजर्सने त्याने असे सेलिब्रेशन करण्यामागे विराट कोहलीबरोबर झालेल्या भांडणानंतर क्रिकेट चाहत्यांकडून होणाऱ्या टिकेला प्रत्युत्तर देणे हे कारण होते, असा कयास लावला आहे.

Naveen-Ul-haq | Rohit Sharma
Ravindra Jadeja Record: जड्डूचा जलवा! IPL मध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच 'ऑलराऊंडर'

आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयस चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज विराटबरोबर नवीनची सामन्यादरम्यान भांडणे झाली होती. त्यानंतर अनेक चाहत्यांकडून त्याच्यावर टीका करण्यात आलेली.

मुंबईच्या 182 धावा

मुंबईने बुधवारी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार आणि ग्रीन व्यतिरिक्त अखेरीस नेहल वढेराने आक्रमक खेळ केला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला 180 धावांचा टप्पा पार करता आला.

लखनऊकडून नवीन व्यतिरिक्त यश ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोहसीनने १ विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com