राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार; सात्विक-चिराग यांना खेलरत्न

National Sports Awards 2023 Announced: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 बुधवारी जाहीर करण्यात आले.
Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak
Published on
Updated on

National Sports Awards 2023 Announced: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 बुधवारी जाहीर करण्यात आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. त्याचबरोबर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार बॅडमिंटन जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेल्या नावांच्या आधारे सात्विक-चिराग यांना खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 9 जानेवारी रोजी क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

दरम्यान, शमीने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेतील 7 सामन्यांत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. चार सामन्यांमधून बाहेर राहिल्यानंतर शमीला संधी मिळाली, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. मात्र, अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शमीचा अर्जुन पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यासाठी विशेष विनंती केली होती. यापूर्वी, देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नव्हते.

Mohammed Shami
Mohammed Shami: "ही गोलंदाजी येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील," PM Modi झाले मोहम्मद शमीचे फॅन

या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणार

मोहम्मद शमी (क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), सुदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), अनुष अग्रवाल (अश्वशक्ति), दिव्यकृती सिंग (अश्वशस्त्र ड्रेसेज), सुदीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुपुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी) रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स) , ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती) अंतिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू) शीतल देवी ( पॅरा आर्चरी), इलुरी अजय कुमार रेड्डी (ब्लाइंड क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

Mohammed Shami
Mohammed Shami ला मोठा झटका! तब्बल 5 वर्षांनंतर पत्नी हसीन जहाँबाबत कोर्टाने दिला 'हा' निर्णय

12 सदस्यीय समितीने पुरस्कार निश्चित केले

गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी) यांची प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी कविता सेल्वराज (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी) यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार ठरवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने 12 सदस्यीय समिती स्थापन केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com