श्रुंगी बांदेकरची राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई

200 मीटर मेडलीत तिसरा क्रमांक, सलग दुसऱ्या वर्षी छाप
shrungi bandekar
shrungi bandekarDainik Gomantak

National Senior Swimming Championships : गोव्याची प्रमुख महिला जलतरणपटू श्रुंगी बांदेकर हिने राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत पदक जिंकण्याचा लौकिक कायम राखताना सोमवारी हैदराबाद येथे ब्राँझपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या 200 मीटर मेडली शर्यतीत 2 मिनिटे 27.96 सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला आणि गोव्याला या स्पर्धेतील पहिले पदक जिंकून दिले.

गाचिबौली-हैदराबाद येथे 76वी राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धा सुरू आहे. महिलांच्या 200 मीटर मेडलीत कर्नाटकाच्या हशिका रामचंद्र हिने 2 मिनिटे 21.15 सेकंद या स्पर्धा विक्रमी वेळेसह सुवर्ण, तर महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिस हिने 2 मिनिटे २६.८९ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले.

shrungi bandekar
आता राज्याची पाणीटंचाईची चिंता मिटणार; जलस्रोतमंत्र्यांची मोठी घोषणा

शर्यतीच्या पात्रता फेरीतही श्रुंगी तिसऱ्या स्थानी होती, तेव्हा तिने २ मिनिटे ३२.८३ सेकंद वेळ नोंदविली होती. मुख्य शर्यतीत तिने कामगिरीत सुधारणा करताना ब्राँझपदक प्राप्त केले. गोव्याच्या अन्य जलतरणपटूंत सोमवारी गोव्याच्या झेवियर डिसोझा याने पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत अंतिम फेरी गाठली, मात्र ५२.५७ सेकंद वेळेसह त्याला आठवा क्रमांक मिळाला.

गतवर्षीही जिंकले होते पदक

श्रुंगीने गतवर्षी आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या ७५व्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत पदक जिंकले होते. तिने तेव्हा महिलांच्या ४०० मीटर वैयक्तिक मेडली शर्यतीत रौप्यपदक पटकावले होते. श्रुंगीने गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील २०० मीटर मेडली शर्यतीत ब्राँझपदक मिळविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com