आता राज्याची पाणीटंचाईची चिंता मिटणार; जलस्रोतमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याला पाण्याची कमतरता भासत असल्याने बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak

Subhash Shirodkar : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला व याचा फटका राज्यातील धरणांना बसला. पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्याने राज्यातील सहा धरणांतील

पाणीसाठा घटला. राज्यात पावसाला सुरुवात होताच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्याला पाण्याची कमतरता भासत असल्याने बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Subhash Shirodkar
Margao News : ब्रेक फेल झाल्याने मडगाव पालिकेच्या वाहनाची दुचाकींना धडक

राज्यात पाण्याची कमतरता होत असल्याने पाणी साठवण्यासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची नितांत गरज आहे.

त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात नवे 100 बंधारे बांधण्याचा निर्णय जलस्रोत खात्याने घेतला असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

डिसेंबर 2024 पर्यंत जलस्रोत खात्याने शंभर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी साठवण्यासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची नितांत गरज असल्याने जलस्रोत खात्याने हा निर्णय घेतला आहे.

बंधारे बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल आणि डिसेंबर 2024 पर्यंत त्यांचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com