Goa T20: ...तर गोव्यात आयपीएलच्या धर्तीवर व्हेटरन क्रिकेट

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची आमसभा
chetan Chauhan Memorial
chetan Chauhan Memorial Dainik Gomantak

पणजी: देशात व्हेटरन्स क्रिकेटसाठीही आयपीएल धर्तीवर स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव भारतीय व्हेटरन्स क्रिकेट महासंघाच्या आमसभेत सादर केला जाईल, अशी माहिती महासंघाचे उपाध्यक्ष विनोद (बाळू) फडके यांनी मंगळवारी दिली. 

(National level Chetan Chauhan Memorial Trophy T20 cricket tournament to be held in Goa)

गोव्यात राष्ट्रीय पातळीवरील चेतन चौहान स्मृती करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा येत्या 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्पर्धेच्या कालावधीत महासंघाची आमसभा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल, ते महासंघाचे अध्यक्षही आहेत. पत्रकार परिषदेस गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटणेकर, यशवंत देसाई, सचिव सुदेश प्रभुदेसाई, सदस्य शरद चोपडेकर, सुशांत नाईक उपस्थित होते.

गोवा व्हेटरन्स क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही असलेले फडके म्हणाले, की निवृत्तीनंतर क्रिकेटपटूंची आर्थिक ढासळू नये यासाठी व्हेटरन्स आयपीएल गरजेची आहे. याशिवाय देशातील व्हेटरन्स क्रिकेटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची संलग्नता मिळावी याबाबतही ठराव आमसभेत मांडण्यात येईल. बीसीसीआय संलग्नेमुळे व्हेटरन्स क्रिकेटला आर्थिक स्थैर्य लाभेल. 

chetan Chauhan Memorial
Vijay Hazare Trophy: स्नेहलचे झुंजार शतक, पण गोवा `चोक`

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हवंय स्टेडियम

गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट येण्यासाठी सुसज्ज स्टेडियम आवश्यक असल्याचे मत फडके यांनी व्यक्त केले. स्टेडियममुळे  गोव्यात सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होऊ शकतील, आयपीएल सामनेही खेळविणे शक्य होईल, असे मत व्यक्त करुन फडके यांनी गोवा क्रिकेट संघटनेची नवी समिती तीन वर्षांत स्टेडियम बांधणीचा प्रश्न निकालात काढेल, असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला. 

chetan Chauhan Memorial
Cricket Tournament:'केरळ'च्या विजयाने 'गोव्या'च्या मर्यादा उघड

दृष्टिक्षेपात गोव्यातील राष्ट्रीय व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धा

  • एकूण 6 संघ, दोन गटात विभागणी

  • विभागीय विजेते हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात, हैदराबाद, पूर्वोत्तर राज्यातील खेळाडूंचा अध्यक्षीय संघ व यजमान गोवा

  • सामने 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधी, अंतिम सामना पर्वरीत प्रकाशझोतात

  • राज्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते उदघाटन, बक्षीस वितरण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते

  • ज्ञानेंद्र पांडे, प्रवीण तांबे, विजय यादव, परमिंदर सिंग आदी स्पर्धेतील प्रमुख खेळाडू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com