काईट सर्फिंग स्पर्धेसाठी वरुण विजेतेपद राखण्यास प्रयत्नशील

स्पर्धेसाठी मांद्रे येथे नोंदणीस सुरवात
National Kite Surfing Competition
National Kite Surfing Competition Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

National Kite Surfing : राष्ट्रीय काईट सर्फिंग स्पर्धेतील गतविजेता वरूण नारायणन विजेतेपद राखण्याच्या उद्देशाने गोव्यात दाखल झाला आहे. स्पर्धेसाठी त्याने शुक्रवारी नोंदणी केली. मांद्रे येथील समुद्रकिनारी स्पर्धेला शनिवारपासून (ता. 16) सुरवात होईल. राष्ट्रीय काईट सर्फिंग मानांकनासाठीही राष्ट्रीय कामगिरी गृहीत धरली जाईल. (National Kite Surfing competition Latest News Updates)

National Kite Surfing Competition
चेन्नईयीन एफसीवर मात करत एफसी गोवाची विजयी सलामी

काईट सर्फिंगचा आनंद लुटणे माझ्यासाठी अतीव महत्त्वाचे आहे, शर्यत कशी संपवतो हे दुय्यम ठरते. विजेतेपद राखण्याचेही उद्दिष्ट्य आहे, असे वरूणने स्पर्धेसाठी नोंदणी केल्यानंतर सांगितले. गतवेळची राष्ट्रीय काईट सर्फिंग स्पर्धा केरळमधील तुतिकोरीन येथे झाली होती.

स्पर्धेस गोव्यातील सर्फर्सकडूनही प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील अव्वल महिला सर्फर किओना रजनी हिनेही शुक्रवारी स्पर्धेसाठी नोंदणी केली. पर्रा येथील १८ वर्षीय किओना हिच्यासाठी ही पहिलीच राष्ट्रीय काईट सर्फिंग स्पर्धा आहेत. काईट सर्फिंगचा आनंद लुटण्यासाठी आपण उत्साहित असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. मोरजी येथे आपण सरावासाठी पालकांसमवेत येत असल्याची माहिती तिने दिली.

युरोपातील 22 वर्षीय युली हे गेली दोन दशके गोव्यात काईट सर्फिंग आणि विंडसर्फिंगचे प्रशिक्षण देतात आपले प्रशिक्षणार्थी स्पर्धेत कशी कामगिरी बजावतात याबाबत त्यांना उत्सुकता आहे. गोव्याचे माजी राष्ट्रीय सर्फर रसेल लोबो स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com