चेन्नईयीन एफसीवर मात करत एफसी गोवाची विजयी सलामी

एफसी गोवा संघ रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी
FC Goa
FC GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

FC Goa : सामन्याच्या उत्तरार्धात जोव्हियल डायस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यांनी चेन्नईयीन एफसीवर 1-0 फरकाने मात केली.

सामना शुक्रवारी नागोवा येथील मैदानावर झाला. सामन्यातील एकमेव गोलची नोंद 72व्या मिनिटास झाली. डेगी कार्दोझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने सामन्यावर वर्चस्व राखत तीन गुणांची कमाई केली. त्यांचा पुढील सामना 19 एप्रिल रोजी बंगळूर एफसीविरुद्ध (Bangalore) नागोवा मैदानावर खेळला जाईल. (Goa Sports Update; FC Goa beat Chennai FC)

FC Goa
Air Indiaच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पगारात झाली वाढ

सुरवातीच्या पाच मिनिटांत एफसी गोवाच्या (FC Goa) गोल करण्याच्या दोन संधी वाया गेल्या. पाचव्या मिनिटास लेस्ली रिबेलोचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे एफसी गोवास आघाडीपासून दूर राहावे लागले. चेन्नईयीननेही प्रतिआक्रमण केले. 14व्या मिनिटास त्यांच्या सय्यद पाशा याचा धोकादायक फटका किंचित हुकला.

उत्तरार्धात चेन्नईयीनने (Chennaiyin FC) आक्रमणावर भर देत एफसी गोवाच्या बचावाची परीक्षा पाहिली, मात्र गोलरक्षक ह्रतीक तिवारीची एकाग्रता प्रतिस्पर्धी भेदू शकले नाहीत. चेन्नईयीनच्या जोसेफ लालवेन्हिमा याला गोलपासून रोखताना ह्रतीकने सारा अनुभव पणास लावला.

निर्णायक गोल

सामन्यातील 18 मिनिटे बाकी असताना अखेर एफसी गोवाने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. बदली खेळाडू वासीम इनामदार याने मैदानाच्या डाव्या बाजूने मुसंडी मारली आणि ज्योव्हियलला क्रॉसपास पुरविला. यावेळी गोल करण्याचे काम जोव्हियलने पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com