World Cup 2023: बांगलादेशचा दारुण पराभव, गतविजेत्या इंग्लंडने विजयाचं खातं उघडलं

BAN vs ENG: विश्वचषक 2023 च्या सातव्या सामन्यात बांगलादेश आणि इंग्लंड आमनेसामने आले होते.
BAN vs ENG
BAN vs ENGDainik Gomantak
Published on
Updated on

BAN vs ENG: विश्वचषक 2023 च्या सातव्या सामन्यात बांगलादेश आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम, धमरशाला येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

इंग्लंडने डेव्हिड मलानच्या (140) शानदार शतकाच्या जोरावर 9 विकेट गमावून 364 धावांचा मोठा डोंगर उभारला होता.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 227 धावांवर ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने 137 धावांनी सामना जिंकला. विश्वचषक 2023 मधील इंग्लंडचा हा पहिला विजय आहे.

मलानचे झंझावाती शतक

इंग्लंडचा (England) तूफानी फलंदाज डेव्हिड मलानने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात 91 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मलानने 107 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 140 धावांची शानदार खेळी केली.

या मैदानावर विश्वचषक इतिहासातील हे सर्वात जलद शतक आहे. तर त्याचे वनडे कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. याशिवाय, कर्णधार जो रुट (82) आणि सलामीवीर जॉनी बेअरस्टो (52) यांनीही शानदार अर्धशतके झळकावली.

BAN vs ENG
World Cup 2023: डेव्हिड मलानचा थरार, वर्ल्ड कपमध्ये ठोकले पहिले 'शतक'; बाबर आझमलाही सोडले मागे

बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले

दरम्यान, या सामन्यात इंग्लिश संघ 400 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत अखेरच्या 12.4 षटकांत 98 धावांत नऊ गडी बाद केले.

डावखुरा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामने (75 धावांत 3 बळी) इंग्लंडची धावसंख्या रोखण्याचा पुरेपुरे प्रयत्न केला.

दुसरीकडे, त्याचा सहकारी ऑफस्पिनर मेहदी हसनची (71 धावांत चार विकेट) चांगली साथ लाभली. याशिवाय, तस्किन अहमद आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

BAN vs ENG
World Cup 2023: मिचेल सँटनरची अष्टपैलू कामगिरी, युवराज सिंगसोबत बनला 'या' खास क्लबचा भाग

रीस टॉपलेची शानदार कामगिरी

फलंदाजांनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज रीस टॉपलेने 10 षटकांत 4 बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

रीस टॉपलेने डावाच्या दुसऱ्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर तनजीद हसन (1), नझमुल हुसेन शांतो (0) यांना बाद केले. यानंतर शाकिब अल हसन (1) देखील बोल्ड झाला. त्याने 51 धावा करुन चांगली फलंदाजी करणाऱ्या मुशफिकर रहीमची चौथी विकेट घेतली.

रीस टॉपलेशिवाय ख्रिस वोक्सने 2 तर सॅम करन, मार्क वुड, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशकडून (Bangladesh) लिटन दासने चांगली फलंदाजी केली. त्याने 66 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली पण संघाला विजयापर्यंत नेण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com