National Junior Archery Competition: महाराष्ट्राची पोरं अन् हरियाणाच्या पोरी 'जिंकल्या'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे केले उद्घाटन
Archery competition
Archery competitionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्राच्या मुलांनी, तर हरियाणाच्या मुलींनी 42 व्या राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह राऊंड प्रकारात सांघिक विजेतेपद मिळविले. या गटातील लढती आज ( शुक्रवारी ) कांपाल येथील मैदानावर पार पडल्या.

(National Junior Archery competition started at Panaji Campal Maharashtra boys team won)

ज्युनियर मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने हरियाणाचे कडवे आव्हान 29-28 असे शूटऑफद्वारे परतावून लावले. दोन्ही संघांत 4-4 अशी बरोबरी झाल्यानंतर शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पार्थ साळुंखे महाराष्ट्राच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्याने वैयक्तिक गटातही 676 गुणांची नोंद केली.

Archery competition
T20 World Cup: या खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

मुलींत विजेतेपद मिळवताना हरियाणाने मध्य प्रदेशचा 6-0 फरकाने धुव्वा उडविला. हरियानाच्या संघात 21 वर्षांखालील विश्वकरंडक विजेती रिद्धी, भजन कौर व तिशा यांचा समावेश होता, त्यांनी शानदार नेम साधत लौकिकास साजेशी कामगिरी केली. मुलींच्या वैयक्तिक गटात पंजाबची ईशा 623 गुणांसह अव्वल आहे. मुलांत ब्राँझपदक सेनादलास मिळाले. त्यांनी पुदुचेरीवर 5-1 फरकाने मात केली. मुलींत तिसरा क्रमांक मिळविताना चंडीगडने झारखंडचा 6-2 असा पराभव केला.

Archery competition
Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारचा न्यायालयाने जामीन केला मंजूर

मुख्यमंत्र्यांचीही तिरंदाजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तिरंदाजीतील आपले कौशल्य आजमावताना लक्ष्यावर नेमही साधला. यावेळी भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, खजिनदार राजेंद्रसिंग तोमर, गोव्याचे क्रीडा संचालक अजय गावडे, गोवा हौशी तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष किरण कांदोळकर, कार्याध्यक्ष डॉ. नीलेश कोरडे, सचिव चेतन कवळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com