National Game Goa 2023 : गोव्याचे बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल ; पदक जिंकण्याची संधी

उपांत्यपूर्व फेरीत सातपैकी पाच खेळाडूंचे विजय
Goa Boxer
Goa Boxer Dainik Gomantak
Published on
Updated on

National Game Goa 2023 : पणजी, गोव्याच्या सातपैकी पाच बॉक्सरनी उपांत्य फेरी गाठल्यामुळे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पदके जिंकण्याची यजमानांना संधी प्राप्त झाली. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू आहे.

गोव्याचे बॉक्सर आता पदक जिंकण्यापासून एक लढत दूर आहेत. सोमवारी (ता. ६) गोव्याचे आणखी चार बॉक्सर उपांत्य फेरी गाठण्यासाठी रिंगमध्ये उतरतील.

साक्षी हिचा हिमाचल प्रदेशच्या ईशा ठाकूर हिच्याविरुद्ध, ए. के. रोझनजमीर याचा सिक्कीमच्या कैलेश कृष्णा याच्याविरुद्ध आकाश गोरखा याचा आंध्र प्रदेशच्या संदीप दोनी याच्याविरुद्ध, तर रजत याचा महाराष्ट्राच्या एम. डी. राहिल याच्याविरुद्ध सामना होईल.

बॉक्सिंग स्पर्धेच्या पाचव्या दिवशी रविवारी फिदरवेट (५४-५७ किलोगट) गटात गोव्याच्या प्रल्हाद पांडा याला महाराष्ट्राच्या ऋषिकेश गौड याच्याकडून ४-१ फरकाने हार पत्करावी लागली. मात्र पुरुषांच्या एलिट लाईट हेवी गटात (७५-८० किलोगट) गोव्याच्या लोकेश याने पंजाबच्या अर्शप्रीत सिंग याचा ५-० असा धुव्वा उडवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुषांच्या एलिट हेवी गटात (८६-९२ किलोगट) गोव्याच्या आयुष साई यानेही आगेकूच राखली. त्याने दिल्लीच्या हर्ष राणा याचा पाडाव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुरुषांच्या एलिट सुपर हेवी गटात (९२+ किलोगट) गौरव चौहान याने धडाका राखला. गौरवच्या आक्रमकतेसमोर हरियानाचा सुमीत रंगी हतबल ठरला. अखेरीस रेफरीने ही लढत थांबवून गौरवला विजयी घोषित केले.

Goa Boxer
Boxing Game : दिवंगत वडिलांसाठी निहारिकाला जिंकायचेय पदक

महिलांत निहारिका, सनामाचा विजयी

एलिट महिलांच्या लाईट गटात (५७-६० किलोगट) गोव्याच्या निहारिका हिने सोप्या विजयासह उपांत्य फेरी गाठली.

तिने शानदार पदलालित्य प्रदर्शित करताना केरळच्या ग्रीटा साजी हिचा ५-० असा धुव्वा उडविला. यजमान संघाच्या सनामाचा चानू हिने एलिट महिलांच्या मिडल गटात (७०-७५ किलोगट) उपांत्य फेरी गाठताना मध्य प्रदेशच्या जिज्ञासा राजपूत हिला पराभूत केले.

मात्र एलिट महिलांच्या वेल्टर गटात (६३-६६ किलोगट) श्रीशा जाम्पुला हिला पराभूत व्हावे लागले. तिच्याविरुद्ध पंजाबची कोमलप्रीत कौर जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com