Boxing Game : दिवंगत वडिलांसाठी निहारिकाला जिंकायचेय पदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ः तेलंगणाची बॉक्सर गोव्याकडून रिंगणात, पॅरिस ऑलिंपिकसाठी प्रयत्नशील
 Niharika Gone | National Games Goa 2023
Niharika Gone | National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Boxing Game : पणजी, निहारिका गोनेला भारतीय बॉक्सिंगमधील परिचित नाव आहे. गतवर्षीपर्यंत तेलंगणाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती गोव्यातर्फे खेळत आहे.

पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महिला बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकून दिवंगत वडिलांना श्रद्धांजली वाहण्याचा तिचा मनोदय आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी कोटा मिळविण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

गोव्याचे प्रतिनिधित्व करताना निहारिकाने महिलांच्या ६० किलो वजन गटात आसामच्या बार्बी गोगोई हिचा पराभव करून पदकाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या स्पर्धेत तिला वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून खेळावे लागले होते.

या धक्क्यातून ती सावरू शकली नाही आणि पराभवामुळे तिचे पदक हुकले होते.

‘‘गेल्या वर्षी मी खूप वाईट अवस्थेतून गेले. आजारी वडिलांना इस्पितळातील अतिदक्षता विभागात सोडून मी स्पर्धा खेळण्यास गेले. त्याचवेळी त्यांचे निधन झाले आणि माझ्या मनोधैर्यावर त्याचा प्रतिकुल परिणाम झाला.

परिणामी मला पराभूत व्हावे. मी अश्रू रोखू शकले नाही. वडिलांसाठी ते अश्रू होते,’’ असे भावूक होत निहारिका म्हणाली. माजी हँडबॉल खेळाडू श्रीराम गोनेला यांच्या चार मुलींपैकी निहारिका दुसरी. २०१४ साली तिने बॉक्सिंग रिंगमध्ये पदार्पण केले.

रेल्वे स्पर्धेत सुवर्णपदक

तेलंगणातून गोव्यात स्थलांतरीत होताना निहारिकाने चांगल्या कामगिरीचे ध्ये बाळगले आहे. हल्लीच बिलासपूर येथे झालेल्या रेल्वेच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने ६० किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले.

पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचा कोटा मिळविण्यासाठी तिचे प्रयत्न आहेत. ‘‘रेल्वे बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला.

३७व्या राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे, पण अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. गाफील राहणे अजिबात परवडणारे नाही,’’ असे निहारिका म्हणाली.

 Niharika Gone | National Games Goa 2023
Ganapath Box Office Collection: 6 व्या दिवशीही 'गणपत'ची अवस्था वाईट...कमाईचा आकडा समाधानकारक नाहीच

वजनगट बदलला

निहारिकाने कारकिर्दीच्या प्रारंभी परदेशात, तसेच भारतात युवा गटात पदके जिंकली. सुरवातीस ती ७५ किलो वजनगटात खेळत होती. मध्यंतरी तिने ६३ किलो वजनगटातही चाचपणी केली, मात्र आता ६० किलो वजनगटावर पूर्ण लक्ष एकवटले आहे.

‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या सबज्युनियर संघाचे प्रशिक्षक जॉन वारबर्टन यांच्यासोबत काम करत आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शैलीत बदल केला आहे.

माझ्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे,’’ असे ती म्हणाली. उंची, वेग आणि चापल्य या बळावर निहारिकाने बॉक्सिंगमध्ये लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com