Rachin Ravindra: 'त्याला पहिल्यांदाच बॉलिंग केली, तो सुपरस्टार...', रचिनची फिफ्टी पाहून दिग्गजही प्रभावित

Nathan Lyon Praises Rachin Ravindra: वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचे झुंझार अर्धशतक पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाजही प्रभावित झाला आहे.
Rachin Ravindra | New Zealand vs Australia
Rachin Ravindra | New Zealand vs AustraliaX/BLACKCAPS
Published on
Updated on

Nathan Lyon praises Rachin Ravindra

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वेलिंग्टनला कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. हा सामना तिसऱ्या दिवसानंतर सध्या रोमांचक वळणावर आहे. दरम्यान, या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने रचिन रविंद्रचे कौतुक केले आहे. त्याने त्याला भविष्यातील सुपरस्टार म्हटले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 369 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवस अखेर 41 षटकात 3 बाद 111 धावा केल्या आहेत. अद्याप त्यांना 258 धावांची गरज आहे.

न्यूझीलंडने वरच्या फळीतील विकेट्स झटपट गमावल्यानंतरही रचिन रविंद्रने डॅरिल मिचेलबरोबर चांगली भागीदारी करत अर्धशतक पूर्ण केले आहे. तो 56 धावांवर नाबाद आहे. त्याने ही खेळी करताना दाखवलेल्या कौशल्याने लायनही प्रभावित झाला आहे.

Rachin Ravindra | New Zealand vs Australia
NZ vs AUS: लायनचा बॅटिंगमध्ये विश्वविक्रम, तर फिलिप्सने 5 विकेट्ससह न्यूझीलंडमध्ये 16 वर्षांनी केला 'तो' पराक्रम

तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर लायनने म्हटले आहे की 'रचिन खूप चांगला खेळाडू असल्याचे दिसत आहे. मी त्याला पहिल्यांदाच गोलंदाजी केली. मी वर्ल्डकपमध्ये त्याला खूप पाहिले आहे. तो सुपरस्टार होणार आहे.'

दरम्यान, रचिन आणि मिचेलने न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात दिलेल्या झुंजीनंतरही लायनने विश्वास व्यक्त केला आहे की ऑस्ट्रेलियाला अजूनही न्यूझीलंडवर दबाव टाकू शकते.

लायन म्हणाला, 'मला माहित आहे जर आम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकलो आणि त्यांच्या बचावाला आव्हान देऊ शकलो, तर आशा आहे आम्ही त्यांच्या विकेट्स घेऊ शकतो.'

याशिवाय या सामन्यात न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सचेही लायनने कौतुक केले.

Rachin Ravindra | New Zealand vs Australia
NZ vs AUS: ख्वाजाला सामन्यादरम्यानच का काढून टाकावे लागले बॅटवरील पक्ष्याचे स्टिकर, जाणून घ्या प्रकरण

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 383 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ 179 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 204 धावांची आघाडी मिळाली होती. पण ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी 164 धावातच संपला. विशेष म्हणजे लायनने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 41 धावा केल्या.

त्यानंतर न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 369 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला असताना लायनने टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांच्या विकेट्स लवकर घेत यजमानांना दबावात टाकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com