IND vs AUS: मांजरेकरांवर भडकला मुरली विजय, भेदभावाचाही केला आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सुरु असताना मुरली विजयने संजय मांजरेकरांना फटकारले आहे.
Murali Vijay | Sanjay Manjrekar
Murali Vijay | Sanjay Manjrekar Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूरला पहिला सामना सुरू आहे. पण हा सामना सुरू असतानाच भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने माजी फलंदाज संजय मांजरेकरांना फटकारले आहे. सध्या याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

झाले असे की शुक्रवारी या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. हा सामना सुरू असताना टेलिव्हिजनवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा भारतातील कनव्हरजन रेट्सची यादी (रुपांतरण दर) दाखवण्यात आली. यामध्ये मुरली विजय अव्वल स्थानी होता.

Murali Vijay | Sanjay Manjrekar
IND vs AUS, 1st Test: दुसऱ्या दिवशी रोहित-जडेजाची कमाल, तर ऑसींसाठी 5 विकेट्स घेणारा मर्फी स्टार

या यादीत मुरलीच्या पाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन, पॉली उम्रिगर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे होती. ही यादी पाहून भारतात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करणाऱ्या सर्वात यशस्वी फलंदाजांबद्दल समालोचन करताना चर्चा सुरू होती. मांजरेकरांनी या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मुरली विजयचे नाव पाहून आश्चर्य व्यक्त केले.

पण, कदाचीत ही गोष्ट मुरली विजयला पटली नाही. त्यामुळे त्याने याबद्दल ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पहिल्यांदा ट्वीट करत लिहिले की 'संजय मांजरेकर चकीत झाले, वाह!' त्यानंतर त्याने ट्वीट केले की 'मुंबईचे काही माजी खेळाडू कधीही दाक्षिणात्य खेळाडूंचे कौतुक करत नाहीत.'

दरम्यान, यावर संजय मांजरेकरांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मुरली विजयला यापूर्वी असा काही अनुभव आला आहे का असा प्रश्नही विचारला आहे. तर अनेकांनी मुरली विजयला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्याला फटकारले आहे.

Murali Vijay | Sanjay Manjrekar
IND vs AUS: वेलकम बॅक जड्डू! पहिल्या कसोटीत 5 विकेट्ससह ऑसींना दणका, पाहा कशी घेतली स्मिथची विकेट; Video

दरम्यान, पहिल्या कसोटीत रोहित शर्माने पहिल्या डावात 120 धावांची शतकी खेळी केली आहे. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवलाखेर 7 बाद 321 धावा करत 144 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 177 धावांवर सर्वबाद झाला आहे.

मुरली विजयने घेतली निवृत्ती

मुरली विजयने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने त्याने जगाभरात क्रिकेटच्या नव्या संधी आणि त्याच्यासंबंधीत व्यावसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

मुरली विजयने त्याच्या कारकिर्दीत कसोटीत 12 शतके आणि 15 अर्धशतकांसह 3982 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने 1 अर्शतकासह 339 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 169 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 106 सामन्यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2619 केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com