Mumbai T20 League Fight: मुंबई टी-20 लीगच्या फायनलमध्ये राडा; खेळाडू भिडले, शिवम दुबे धावत गेला अन्... व्हिडिओ होतोय व्हायरल

Mumbai T20 League 2026 Fight Video: मुंबई T20 लीगच्या अंतिम सामन्यात क्रिकेटच्या मैदानात खिलाडूवृत्तीला हरताळ फासणारी घटना घडली.
Mumbai T20 League Fight
Mumbai T20 League FightDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई T20 लीगच्या अंतिम सामन्यात क्रिकेटच्या मैदानात खिलाडूवृत्तीला हरताळ फासणारी घटना घडली. मराठा रॉयल्स आणि ARCS अंधेरी यांच्यातील हा खिताबी सामना विजयापेक्षा खेळाडूंमधील वादामुळेच जास्त चर्चेत राहिला. सामन्याच्या निर्णायक क्षणी दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानात उतरल्याने परिस्थिती अधिकच चिघळली होती. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

१९ व्या षटकात वादाची ठिणगी

सामना अत्यंत चुरशीचा सुरू असताना १९ व्या षटकात वादाला तोंड फुटले. ARCS अंधेरीचा फलंदाज गौरव जाथर आक्रमक फलंदाजी करत असताना त्याला इरफान उमैरने LBW बाद केले. विकेट मिळाल्यानंतर मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी अतिशय आक्रमक पद्धतीने जल्लोष केला. हे वर्तन गौरव जाथरला खटकले आणि त्याने जाब विचारला. यातूनच जाथर आणि मराठा रॉयल्सचा गोलंदाज तुषार देशपांडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पंचांना आणि इतर खेळाडूंना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.

Mumbai T20 League Fight
Goa Education: हिंदी विषय अभ्यासक्रमात कायम, 'जीएससीईआरटी'चे स्पष्टीकरण

डगआउटपर्यंत पोहोचला वाद

मैदानावरील हा वाद तिथेच थांबला नाही. काही वेळातच मराठा रॉयल्सचा एक खेळाडू थेट ARCS अंधेरीच्या डगआउटजवळ पोहोचला, जिथे कर्णधार शिवम दुबेसह इतर खेळाडू बसले होते. तिथे पुन्हा एकदा गौरव जाथर आणि विरोधी खेळाडूंमध्ये जुंपली. प्रकरण हाताबाहेर जाताना पाहून दोन्ही संघांच्या सपोर्ट स्टाफने धाव घेत खेळाडूंना वेगळे केले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे सामन्याचा आनंद काहीसा मावळला.

Mumbai T20 League Fight
Goa: सुशेगाद गोव्याची घुसमट: विकृतीच्या विळख्यात अडकलेला स्वर्ग! जबाबदार कोण?

MCA कडून कारवाईचे संकेत

सामन्यात मराठा रॉयल्सने १५४ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत हा सामना जिंकला आणि ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र, हा विजय वादाच्या सावलीत राहिला. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आता या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेण्याच्या तयारीत आहे. मॅच रेफरीच्या अहवालानुसार, दोषी खेळाडूंवर दंड किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com