

IPL 2026 Points Table Standings: आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या मुंबईने अखेर विजयाची चव चाखली. पाच वेळा विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव करुन या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. पहिल्या विजयानंतर मुंबईच्या पराभवाचे सत्र सुरु झाले होते, जे थांबण्याचे नाव घेत नव्हते. मात्र, गुजरातविरुद्धच्या विजयाने मुंबईला केवळ दोन गुणच मिळवून दिले नाहीत, तर गुणतालिकेतही मोठी झेप घेण्यास मदत केली. मुंबईच्या या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्ससह तीन मोठ्या संघांना मोठे नुकसान सहन करावे लागले असून गुणतालिकेतील प्लेऑफची शर्यत आता अधिक रंजक झाली.
या हंगामातील गुणतालिकेवर नजर टाकली तर पंजाब किंग्सने आपले अव्वल स्थान अत्यंत भक्कम केले. पंजाबने इतकी मोठी आघाडी घेतली की, त्यांना या स्थानावरुन खाली खेचणे इतर संघांसाठी कठीण दिसत आहे. सध्याच्या घडीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्या तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद 6 गुणांसह चौथ्या स्थानी असून हेच टॉप 4 संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्सचेही प्रत्येकी 6 गुण आहेत, मात्र कमी नेट रनरेटमुळे त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या विजयासह थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईच्या या आगेकूचमुळे चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघांना फटका बसला असून ते प्रत्येकी एक स्थानाने खाली घसरले. विशेषतः कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था अत्यंत बिकट असून 7 सामन्यांनंतर त्यांच्याकडे केवळ 3 गुण आहेत. मुंबईने आपला फॉर्म परत मिळवल्याने आता मधल्या फळीतील संघांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली.
आज, 21 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांचे सध्या प्रत्येकी 6 गुण आहेत. आज जो संघ जिंकेल, तो 8 गुणांसह थेट टॉप 4 मध्ये आपली जागा पक्की करेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने 'करो या मरो' असा ठरणार आहे. मुंबईच्या विजयाने स्पर्धेत पुन्हा एकदा प्राण फुंकले असून येणारे सामने अधिक रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.