आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Mahela Jayawardene Resigns as Mumbai Indians Head Coach: मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने आणि फ्रँचायझी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
Mahela Jayawardene Resigns as Mumbai Indians Head Coach
Mahela Jayawardene Resigns Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mahela Jayawardene Resigns: आयपीएल 2027च्या हंगामापूर्वी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने आणि फ्रँचायझी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या धक्कादायक निर्णयानंतर आता संघात पुन्हा एकदा नेतृत्वात बदल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जयवर्धने यांचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास अत्यंत यशस्वी राहिला. 2017 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हेड कोच म्हणून सूत्रे हाती घेतली आणि 2017, 2019 व 2020 मध्ये संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली.

Mahela Jayawardene Resigns as Mumbai Indians Head Coach
Rohit Sharma Fan: रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकणार तेव्हाच दाढी करणार अन् केस कापणार! हिटमॅनच्या चाहत्याचा हटके संकल्प चर्चेत

फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानी यांनी जयवर्धने यांच्या योगदानाचे भरभरुन कौतुक केले आणि त्यांच्या शांत नेतृत्वाचे व निष्ठेचे आभार मानले, तर जयवर्धने यांनीही मुंबई इंडियन्ससोबतचा दहा वर्षांपेक्षा जास्त काळचा प्रवास कायम स्मरणात राहील असे सांगितले.

Mahela Jayawardene Resigns as Mumbai Indians Head Coach
भारतीय क्रिकेटमध्ये ऑल इज नॉट वेल! रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटमधील वादाचे एकामागून एक खुलासे; आणखी एका रिपोर्टनं खळबळ

दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) व्यवस्थापन पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. 2024 मध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले, परंतु त्या हंगामात संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली.

Mahela Jayawardene Resigns as Mumbai Indians Head Coach
Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

त्यानंतर 2025 मध्ये संघाने प्लेऑफपर्यंत मजल मारली असली, तरी 2020 नंतर मुंबईला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे आगामी आयपीएल 2027 मध्ये जुन्या यशस्वी फॉर्म्युल्याकडे परतत रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्यावर वरिष्ठ व्यवस्थापनाचा भर आहे. महेला जयवर्धने यांच्या जाण्यानंतर आता नवीन कोचचा शोध घेणे आणि नेतृत्वाचा तिढा सोडवणे ही मुंबई इंडियन्ससमोरील सर्वात मोठी आव्हाने असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com