Rohit Sharma: 'इकडे बर्थडे विश करा...', जेव्हा खुद्द हिटमॅनच चाहत्यांना देतो 'सरप्राईज'

Video: रोहित शर्मा उद्या त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, त्याआधी त्याने चाहत्यांना सरप्राईज दिले.
Rohit Sharma gave surprise to his fans
Rohit Sharma gave surprise to his fansDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Surprise Fans: भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा उद्या म्हणजेच 30 एप्रिलला त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याचा जन्म नागपूरमध्ये 30 एप्रिल 1987 रोजी झाला होता. महत्त्वाचे म्हणजे रोहित यंदा त्याच्या वाढदिवशी मैदानात खेळताना दिसणार आहे.

उद्या मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल 2023मधील 42 वा सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियवर होणार आहे. त्यामुळे रोहितसाठी त्याचा वाढदिवस आणखी खास करण्याची संधी असणार आहे.

Rohit Sharma gave surprise to his fans
Rohit Sharma: केवळ 28 धावांवर बाद झाला, पण हिटमॅन 'हा' विक्रम करत विराट-धवनच्या पंक्तीत सामील

दरम्यान, रोहितला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सने काही चाहत्यांना रोहितला शुभेच्छा देण्याची संधीही दिली होती. पण या चाहत्यांनाच रोहितने सरप्राईज दिले. या क्षणांचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की चार चाहते कॅमेऱ्यात पाहून रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देत होते. पण त्याचवेळी रोहित मागून येतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की 'तिकडे काय शुभेच्छा देता, इकडे द्या ना.' हे ऐकून आणि अचानक रोहितला पाहून चाहते आवाक झाल्याचेही दिसते. तसेच त्यानंतर रोहितने या चाहत्यांबरोबर चर्चाही केली.

Rohit Sharma gave surprise to his fans
IPL 2023: पंजाबविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवूनही लखनऊला धक्का! मॅच विनर खेळाडूच झाला जखमी

दरम्यान, रोहित हा मुंबई इंडियन्सचा दिग्गज कर्णधारही आहे. त्याने 10 वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतली होती. त्यानंतर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले.

सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 मधील मुंबईच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांची कामगिरी संमिश्र झाली आहे. मुंबईने आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत, तसेच 4 सामने पराभूत झाले आहेत.

तसेच रोहित शर्माने या हंगामात मुंबईला चांगली सुरुवात दिली आहे. पण त्याला मोठी खेळी करण्यात फारसे यश मिळाले नाही. त्याने 7 सामन्यात 25.86 च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com