MI Funny Video: असं कोण करतं भावा? गाढ झोपलेल्या तिलकच्या तोंडातच सूर्याने पिळला लिंबू

सूर्यकुमार यादव तिलक वर्माबरोबर विमान प्रवासादरम्यान मस्ती करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Suryakumar Yadav squirt lemon juice into a sleeping Tilak Verma’s mouth
Suryakumar Yadav squirt lemon juice into a sleeping Tilak Verma’s mouthDainik Gomantak

Suryakumar Yadav squirt lemon juice into a sleeping Tilak Verma’s mouth: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली आहे. मुंबईने या स्पर्धेत प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून दुसऱ्या क्वालिफायरमध्येही स्थान मिळवले आहे. मुंबईकडून या हंगामात कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, आकाश मधवाल अशा अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, सूर्यकुमार मैदानातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील मस्तीमुळेही चर्चेत येत असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुंबई इंडियन्समधील त्याचा संघसहकरी तिलक वर्माबरोबर मस्ती करताना दिसत आहे.

Suryakumar Yadav squirt lemon juice into a sleeping Tilak Verma’s mouth
IPL 2023: विराटला नडणाऱ्या नवीन उल हकने कोहलीसोबतच्या वादावर सोडले मौन, म्हणाला...

मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये दिसते की मुंबई इंडियन्सचा संघ विमानातून प्रवास करत आहे. या प्रवासादरम्यान तिलक वर्मा विमानात गाढ झोपला होता. त्यावेळी सूर्यकुमार यादव एअर हॉस्टेसकडून लिंबू घेतो.

त्यानंतर तो लिंबूचा रस गाढ झोपलेल्या तिलकच्या तोंडात टाकतो. त्यानंतर अचानक तिलक जागा होतो. त्याला काही क्षणांसाठी काय झालं हे कळत नाही. त्यावेळी बाकी लोक हसत असतात. या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

यापूर्वीही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार, नेहल वढेरा यांच्यासह काही मुंबई इंडियन्सचे सदस्य 'सैय्या' हे गाणं गात आहेत. हा गमतीशीर व्हिडिओही चाहत्यांना चांगलाच भावला होता. त्यावरही अनेक मजेशीर कमेंट्स आल्या होत्या.

Suryakumar Yadav squirt lemon juice into a sleeping Tilak Verma’s mouth
गुजरातचा पराभव निश्चित? Mumbai Indians ने पोलार्डच्या बर्थडेला विरोधकांचे वाजलेत 'बारा'; अजब योगायोग पाहाच...

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 स्पर्धेत साखळी फेरीतील 14 सामन्यांतील 8 सामने जिंकले तसेच 6 सामने पराभूत झाले होते. त्यामुळे 16 गुणांसह त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com