बंगळूरला नमवून मुंबई सिटी अव्वल

बंगळूर एफसीविरुद्ध पेनल्टी फटक्यावर गोल करताना मुंबई सिटीचा इगोर आंगुलो.
Mumbai City tops Bengaluru
Mumbai City tops BengaluruDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गतविजेत्या मुंबई (Mumbai) सिटीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अव्वल स्थान मिळविताना शनिवारी रात्री माजी विजेत्या बंगळूर एफसीचा 3-1 असा पराभव केला. सामना बांबोळी (Bambolim) येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर झाला.

मुंबई सिटीसाठी स्पॅनिश इगोर आंगुलो (9 वे मिनिट, पेनल्टी), सेनेगलचा मुर्तदा फॉल (54 वे मिनिट) व बदली खेळाडू ब्राझीलियन य्गोर कातातौ (85 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या 20व्या मिनिटास ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने बंगळूरला बरोबरी साधून दिली होती, मात्र कर्णधार सुनील छेत्री याला अचूक पेनल्टी फटका मारता आला नाही. 44व्या मिनिटास छेत्रीची स्पॉट किक मुंबई सिटीचा गोलरक्षक महंमद नवाझ याने अचूक अंदाज बांधत अडविली. मोसमात छेत्रीने दुसऱ्यांदा पेनल्टी किक दवडली. मुंबई सिटीच्या आंगुलो याने आता यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चार गोल करण्याचा मान मिळविला.

Mumbai City tops Bengaluru
एफसी गोवावर पुन्हा पराभवाची नामुष्की; कमाराच्या गोलमुळे नॉर्थईस्ट विजयी

मागील लढतीत एटीके मोहन बागानचा 5-1 फरकाने धुव्वा उडविलेल्या मुंबई सिटीचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत चार लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक नऊ गुण झाले आहेत. त्यांनी चेन्नईयीनवर दोन गुणांची आघाडी घेतली आहे. बंगळूरला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे चार लढतीनंतर चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com