ISL: गतविजेते मुंबई सिटी स्पर्धेबाहेर; केरळा ब्लास्टर्स उपांत्य फेरीत

हैदराबादसह जमशेदपूर, एटीके मोहन बागान या संघांनी यापूर्वीच स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे.
Football
Football Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गतविजेते मुंबई सिटी आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद झाले. शनिवारी रात्री हैदराबाद एफसीने त्यांना 2-1 फरकाने हरविल्यामुळे केरळा ब्लास्टर्स संघ उपांत्य फेरीतील चौथा संघ ठरला. हैदराबादसह जमशेदपूर, एटीके मोहन बागान या संघांनी यापूर्वीच स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे. (ISL News Updates)

Football
निकालाआधीच मोर्चेबांधणी; गोवा काँग्रेसच्या रणनीतीची दिल्लीत बैठक

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 19 वर्षीय आघाडीपटू रोहित दानू याने 14व्या मिनिटास हैदराबादचे (Hyderabad) गोलखाते उघडले. नंतर 41व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जोएल चिनेजी याने आघाडी भक्कम केली. 76व्या मिनिटास सेनेगलच्या मुर्तदा फालच्या हेडरमुळे मुंबई सिटीची पिछाडी एका गोलने कमी झाली.

Football
दिलासादायक; गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर पोहोचला 0.40 टक्क्यांवर

हैदराबादचा हा 20 लढतीतील अकरावा विजय ठरला. त्यांचे आता 38 गुण झाले असून जमशेदपूरनंतर (40 गुण) दुसरा क्रमांक मिळाला. एटीके मोहन बागान (ATK Mohun Bagan) (37गुण) तिसऱ्या स्थानी आहे. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना जमशेदपूर व एटीके मोहन बागान यांच्यात होईल. त्यानंतर क्रमवारी निश्चित होईल. केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) (33 गुण) रविवारी एफसी गोवाविरुद्ध खेळेल. मुंबई सिटीस 20 लढतीत सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 31 गुणांसह ते पाचव्या क्रमांकावर कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com