Manish Jadhav
आयपीएल 2025 चा हंगाम राशीद खानसाठी काही खास राहिला नाही. करामती खानला या हंगामात आपला जलवा दाखवता आला नाही.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यातही चेन्नईच्या फलंदाजांनी राशिदचा चांगलाच समाचार घेतला.
अफगाणिस्तानच्या या फिरकी गोलंदाजाने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 42 धावा दिल्या. सीएसकेच्या फलंदाजांनी राशीदला टार्गेट केले. त्याच्याविरुद्ध त्यांनी मोठी फटकेबाजी केली.
राशीदला चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ एकच विकेट मिळवता आली. यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड राशीदच्या नावावर नोंदवला गेला.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार खाण्याचा रेकॉर्ड आता राशीदच्या नावावर नोंदवला गेला. लाजिरवाण्या रेकॉर्डच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहोचला.
2025 च्या आयपीएलमध्ये फलंदाजांनी आतापर्यंत राशीदच्या गोलंदाजीवर एकूण 31 षटकार मारले. 2022 मध्ये मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी एका हंगामात एकूण 31 षटकार मारले होते.