MS Dhoni: 'धोनीच्या उत्तराधिकाऱ्यासाठी गेले 10 वर्षे आम्ही...' कोच फ्लेमिंग यांचे मोठे भाष्य

Stephen Fleming: एमएस धोनीच्या भविष्याबद्दल स्टिफन फ्लेमिंग यांनी मोठे भाष्य केले आहे.
 Stephen Fleming and MS Dhoni
Stephen Fleming and MS DhoniDainik Gomantak

CSK coach Stephen Fleming opened up about succession plans for MS Dhoni:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) पार पडला. या लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांसह संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्णधार एमएस धोनीच्या भविष्याबद्दलही भाष्य केले.

गेल्या काही महिन्यापासून चेन्नई सुपर किंग्स संघात धोनीची जागा कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर बोलताना फ्लेमिंग यांनी सांगितले की याबद्दल गेल्या 10 वर्षांपासून चर्चा होत आहे.

लिलावादरम्यान धोनीबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले, 'गेल्या 10 वर्षांपासून आमच्याकडे एमएस धोनीच्या उत्तराधिकाऱ्यासाठी योजना आहेत. हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पण मी बऱ्याच वर्षांपासून त्याला त्याच उत्साहात सहभागी होताना पाहात आहे. त्याची जिद्द ही संघासाठी आणि फ्रँचायझीसाठी आहे आणि आम्ही पुढे जात राहू.'

 Stephen Fleming and MS Dhoni
MS Dhoni Jersey: जर्सी नंबर 7 फक्त धोनीचाच! BCCI ने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, धोनी 2023 आयपीएलमध्ये अखेरचा खेळेल , असे अनेकांना वाटत होते. मात्र, धोनीने तो पुढील हंगामही खेळू शकतो, याची शक्यता वर्तवली होती. धोनी २०२३ मध्ये गुडघ्याची दुखापत असतानाही खेळला होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने विजेतेपदालाही गवसणी घातली.

त्याने या हंगामानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करून घेतली. आता शस्त्रक्रियेनंतर आणखी एक हंगाम खेळण्यास धोनी सज्ज असून त्याचेच नाव कर्णधारपदासाठीही कायम करण्यात आले आहे. त्यामुळे धोनीला पुन्हा एकदा मैदानात पाहाण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

 Stephen Fleming and MS Dhoni
WI vs ENG T20I: IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सॉल्टचं सलग दुसरं शतक! इंग्लंडचा विंडीजला धोबीपछाड

दरम्यान, यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये रविंद्र जडेजाकडे चेन्नईचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, त्याने संघाच्या खराब कामगिरीनंतर अर्ध्यातून कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धोनीने चेन्नईचे कर्णधारपद स्विकारले. धोनीने चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामात नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

चेन्नईने 6 खेळाडूंना केले खरेदी

आयपीएल 2024 लिलावात चेन्नईने डॅरिल मिशेल (14 कोटी), रचिन रवींद्र (1.80 कोटी), शार्दूल ठाकूर (4 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), मुस्ताफिझूर रहमान (2 कोटी), अविनाश अरवेल्ली (20 लाख) या खेळाडूंना खरेदी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com