जो रूटने मोडला सुनील गावस्करांचा मोठा विक्रम, आता सचिनला मागे टाकण्याच्या तयारीत

म्हणून रूटला आता सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी मिळाली आहे.
Joe Root
Joe RootDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs England: इंग्लंडने भारताविरुद्धच्या (ENGvsING) एजबॅस्टन कसोटीत 378 धावांचे लक्ष्य गाठून शानदार विजयाची नोंद केली. इंग्लंडच्या विजयात माजी कर्णधार जो रूटचा (Joe Root) मोलाचा वाटा होता. रुटने 142 धावांच्या शानदार खेळीसह सुनील गावस्कर आणि रिकी पाँटिंग या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. यासह रूटला आता सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी मिळाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये सुनील गावस्करला मागे टाकत जो रूट हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रूटने भारताविरुद्धच्या 25 कसोटीत 2526 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गावसकरने इंग्लंडविरुद्धच्या 38 सामन्यात 2483 धावा केल्या होत्या. आता फक्त सचिन तेंडुलकर रूटच्या पुढे आहे ज्याने 2535 धावा केल्या आहेत. जर रूट 9 धावा करू शकला तर तो या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही मागे टाकेल.

Joe Root
IND vs ENG: इतिहास रचण्याची आशा बाळगून असलेल्या टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारून पराभव

रूटचा उत्कृष्ट फॉर्म सुरूच

भारताविरुद्ध कलेल्या या शतकासह रूटने आणखी एक खास स्थान गाठले आहे. भारताविरुद्ध रूटचे हे 9वे जोरदार शतक ठोकले आहे.रुटशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला भारताविरुद्ध इतकी शतके झळकावता आलेली नाहीत. यापूर्वी पाँटिंगने भारताविरुद्ध 8 शतके झळकावली होती.

Joe Root
India vs England:...पण अश्विनचा हा अप्रतिम झेल पाहा VIDEO

जो रूट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे. जो रूटने गेल्या वर्षीपासून आतापर्यंत 11 शतके झळकावली आहेत. रूटने 18 महिन्यांत स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. सध्या जो रूट हा फॅब 4 मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com