MS DHoni Records: आयपीएल 2023 च्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते.
या सामन्यात CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचा निर्णय दिला.
या सामन्यात धोनीने आयपीएलचा इतका मोठा विक्रम आपल्या नावावर केला, जो मोडणे तर दूरच, दिग्गज खेळाडूही त्याची बरोबरीही करु शकणार नाहीत.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात धोनीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली.
सामना सुरु होण्यापूर्वी नंबर एकवर धोनी आणि डी कॉक बरोबरी होते. दोघांनी टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 207 झेल घेतले.
या सामन्यात महेश तिक्षानाच्या चेंडूवर धोनीने एडन मार्करामला झेलबाद केले, त्यानंतर डी कॉकवर मात करत त्याने पहिले स्थान काबीज केले. अव्वल 5 मध्ये धोनी एकमेव भारतीय नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या यादीत धोनीपेक्षा फक्त तीन झेल मागे आहे.
208 – एमएस धोनी
207 - क्विंटन डी कॉक
205 – दिनेश कार्तिक
172 – कामरान अकमल
150 - दिनेश रामदिन
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली होती. चेन्नईने या मोसमाची सुरुवात गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवाने केली.
मात्र, यानंतर संघाने सलग दोन सामने जिंकून 4 गुण मिळवले. पुढच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून संघाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले.
मात्र, संघाने आरसीबीविरुद्ध (RCB) स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. या सामन्याच्या निकालापर्यंत चेन्नईचा संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता.
पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्जला 135 धावांचे लक्ष्य दिले.
हैदराबादला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 134 धावा करता आल्या. संघाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने 21 धावा काढल्या.
त्यांच्याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय आकाश सिंग, महिश तिक्षना आणि मथिशा पाथिराना यांनी 1-1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.