उत्कंठावर्धक लढतीत ‘एमपीटी’ची बाजी

क गट क्रिकेट: पॉलिटिक्स इलेव्हनवर दोन धावांनी मात
Cricket MPT
Cricket MPTDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्कंठावर्धक अंतिम लढतीत पॉलिटिक्स इलेव्हनवर अवघ्या दोन धावांनी मात करून एमपीटी स्पोर्टस क्लबने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या क गट क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. सामना गुरुवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. ( State Level C Group Cricket Tournament MPT's bet thrilling fight )

पॉलिटिक्स इलेव्हनने एमपीटी संघाचा डाव 8 बाद 202 धावांत रोखला, पण नंतर त्यांचा डाव 200 धावांत संपुष्टात आला. एमपीटी संघाच्या डावात सलामीच्या आरिफ शेख याने 120 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पॉलिटिक्स इलेव्हनच्या सागर कोरे याने एकहाती किल्ला लढविताना 61 धावांची अर्धशतकी खेळी केली, पण त्याला सहकाऱ्यांची उपयुक्त साथ मिळाली नाही. सागरने अष्टपैलू चमक दाखविताना चार गडीही बाद केले.

पॉलिटिक्सला शेवटच्या दोन षटकांत चार धावांची गरज होती व शेवटची विकेट मैदानावर होती. एमपीटीच्या प्रशांत हळदणकर याने फक्त एक धाव देत शेवटचा गडी शुभम झा याला त्रिफळाचीत बाद केले.

Cricket MPT
वृद्धिमान साहा पुन्हा चर्चेत, बंगाल संघाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट

संक्षिप्त धावफलक : एमपीटी स्पोर्टस क्लब : 40 षटकांत 8 बाद 202 (आरिफ शेख 87, नंदेश गौडा 10, संजय दाभोळकर 20, अरुण दोडामणी 33, सुनील गावस 16, राजेश सिग्नापूरकर 1-6, वामन परब 1-42, सागर कोरे 4-38, निकेश पणजीकर 1-35) वि. वि. पॉलिटिक्स इलेव्हन : 39 षटकांत सर्वबाद 200 (सचिन गस्ती 30, सागर मोरे 14, सागर कोरे 61, पुनाजी अय्यर 11, सुधांशू ठाकूर 12, रघू परब 12, राजेश सिग्नापूरकर नाबाद 16, प्रशांत हळदणकर 1-20, शिवशंकर मल्लाह 3-33, दामोदर केरकर 1-41, अंश नाईक 1-38, संजय दाभोळकर 2-42).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com