Year Ending: भारताकडून 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, शमी 'या' क्रमांकावर

Most ODI Wickets in 2023: साल 2023 मध्ये भारताकडून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पाच गोलंदाजांबद्दल जाणून घ्या.
Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Mohammad Shami, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah
Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Mohammad Shami, Ravindra Jadeja, Jasprit BumrahX
Published on
Updated on

Most ODI Wickets taken by Indian Bowlers in 2023:

भारतीय क्रिकेट संघाने 21 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. ही मालिका 2023 मधील भारताची शेवटची वनडे मालिका होती.

त्यामुळे या मालिकेनंतर यावर्षी वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज निश्चित झाले आहेत. अशाच भारताकडून 2023 वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर टाकू.

2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय

5. जसप्रीत बुमराह

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने याचवर्षी पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर 10 महिन्यांनी पुनरागमन केले होते. त्याने पुनरागमानंतरही शानदार कामगिरी सुरु ठेवली. त्याने 2023 वर्षात 17 सामन्यांमध्ये खेळताना 28.28 च्या सरासरीने आणि 4.40 च्या इकोनॉमी रेटने 28 विकेट्स घेतल्या. त्याने एकदा 4 विकेट्स घेण्याचाही कारनामा यावर्षी केला.

Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Mohammad Shami, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah
Year Ending: गिल ते अय्यर, भारताकडून वनडेत 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5; चौघांच्या 1000 धावा पार

4. रविंद्र जडेजा

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने या वर्षात 26 वनडे सामने खेळताना 28.19 च्या सरासरीने आणि 4.60 च्या इकोनॉमी रेटसह 31 धावा केल्या. त्याने एकाच सामन्यात एकदा 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला.

३. मोहम्मद शमी

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा गाजवलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी हे वर्ष यशस्वी ठरले. त्याने या वर्षात 19 वनडे सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 16.46 च्या सरासरीने आणि 5.32 च्या इकोनॉमी रेटसह 43 विकेट्स घेतल्या.

त्याने तब्बल 4 वेळा या वर्षात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचाही कारनामा केला. तो 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Mohammad Shami, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah
Year Ending: वर्ल्डकप ते एशियन गेम्स, या स्पर्धा 2023 मध्ये भारतात झाल्या सर्वाधिक ट्रेंड

2. मोहम्मद सिराज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिराजने या वर्षात 25 वनडे सामने खेळताना 20.68 च्या सरासरीने आणि 5.28 च्या इकोनॉमी रेटने 44 विकेट्स घेतल्या. त्याने एकदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली.

1. कुलदीप यादव

चायनामन गोलंदाज कुलदीप यादव 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने या वर्षात 30 वनडे सामने खेळले. या 30 सामन्यांत त्याने 20.48 च्या सरासरीने आणि 4.61 च्या इकोनॉमी रेटने 49 विकेट्स घेतल्या. त्याने यामध्ये एकदा 5 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com