Year Ending: गिल ते अय्यर, भारताकडून वनडेत 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5; चौघांच्या 1000 धावा पार

Most ODI Runs in 2023: साल 2023 मध्ये भारताकडून सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या पाच फलंदाजांबद्दल जाणून घ्या.
KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat KohliBCCI

Most Runs Scorer in ODI Cricket for India in 2023:

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच 17 ते 21 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान ही मालिका भारताची 2023 वर्षातील शेवटची वनडे मालिका होती. त्यामुळे यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे.

2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

5. श्रेयस अय्यर

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

त्याने 20 वनडे सामन्यांमध्ये 19 डावात 52.87 च्या सरासरीने 846 धावा केल्या. यामध्ये 3 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 128 धावा ही त्याची यावर्षीची सर्वोच्च खेळी ठरली, जी त्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध केली होती.

KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
Year Ending: मॅथ्यूज टाईम आऊट ते IPL लिलाव, 2023 मधील 'या' 5 घटनांनी क्रिकेट चाहत्यांना केलं चकीत

4. केएल राहुल

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

त्याने यावर्षी 27 वनडे सामने खेळले, ज्यातील 24 डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 66.25 च्या सरासरीने 2 शतके आणि 7 अर्धशतकांसह 1060 धावा केल्या. त्याने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध केलेली 111 धावांची खेळी ही त्याची यावर्षातील सर्वोच्च खेळी ठरली.

3. रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्माने 2023 वर्षात शानदार नेतृत्वाबरोबर दमदार फलंदाजीही केली. त्याने या वर्षात 27 वनडे सामन्यांतील 26 डावात फलंदाजी करताना 52.29 च्या सरासरीने 1255 धावा केल्या. त्याने या वर्षात 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली.

त्याने अफगाणिस्तानविरुद्ध वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 131 धावांची खेळी केली होती. ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळी ठरली. तो यावर्षी भारताकडून सर्वाधिक वनडे धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.

KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
Year Ending: वर्ल्डकप ते एशियन गेम्स, या स्पर्धा 2023 मध्ये भारतात झाल्या सर्वाधिक ट्रेंड

2. विराट कोहली

विराट कोहलीसाठी हे वर्ष खास ठरले आहे. त्याने याच वर्षात वनडेत 50 शतकांचा टप्पा पार केला. त्याने या वर्षात 27 वनडे सामन्यांतील 24 डावात फलंदाजी करताना 72.47 च्या सरासरीने 1377 धावा फटकावल्या. त्याने यावर्षात भारताकडून सर्वाधिक वनडे शतकेही झळकावली. त्याने यावर्षात वनडेत 6 शतके आणि 8 अर्धशतके केली.

तो यावर्षी भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राहिला. विराटसाठी नाबाद 166 धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली, जी त्याने श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतरपुरमला झालेल्या वनडेत केली होती.

1. शुभमन गिल

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. तो यावर्षी भारताकडून सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यावर्षी 29 वनडे सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने 1584 धावा केल्या.

तो 1500 वनडे धावा यावर्षी पार करणारा भारताचा एकमेव फलंदाज आहे. या धावा करताना त्याने 5 शतके आणि 9 अर्धशतके केली. त्याने यावर्षात एक द्विशतकही झळकावले. त्याने न्यूझीलंड विरुद्ध हैदराबादविरुद्धच्या वनडेत 208 धावांची खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com