GT vs CSK: आयपीएल 2023 चा हंगाम सुरु झाला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरातचा संघ आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
ज्यामध्ये गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होताच गुजरातचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने मैदानावर दहशत निर्माण केली.
तुफानी गोलंदाजी करताना त्याने चेन्नईच्या एका फलंदाजाला उत्कृष्ट पद्धतीने बाद केले आणि यासोबतच त्याने एक विक्रमही केला.
गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील तिसरे आणि आपल्या दुसऱ्या षटकात शमीने भेदक चेंडू टाकला. विशेष म्हणजे, फलंदाजीला आलेल्या डेव्हॉन कॉनवेला त्याने टाकलेला चेंडू अजिबात समजला नाही. कॉनवे 1 रन करुन शमीचा बळी ठरला.
पहिल्या विकेटसह मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम केला. कॉनवे बाद झाल्यानंतर शमीने आयपीएलमधील 100 बळी पूर्ण केले.
शमीने 94 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला. या 100 विकेट्ससह शमी आयपीएलमध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
चेन्नईची प्लेइंग-11: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली (Moeen Ali), शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर आणि राजवर्धन हंगेरगेकर.
गुजरात टायटन्सची प्लेइंग-11: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल आणि अल्झारी जोसेफ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.