PAK vs SL: आशिया कप 2023 चा सुपर-4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
त्याचवेळी, श्रीलंकेला हे लक्ष्य 42 षटकांत गाठावे लागणार आहे. पावसामुळे हा सामना 45 षटकांचा करण्यात आला होता. मात्र यानंतर पावसाने पुन्हा दस्तक दिली. पुन्हा पाऊस पडल्याने सामना 42 षटकांचा करण्यात आला.
पाकिस्तानने 42 षटकात 7 विकेट गमावत 252 धावा केल्या. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.
मात्र, आता अंतिम फेरीत भारताला (India) कोणता संघ आव्हान देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.
पाकिस्तान-श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली.
पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान 11 चेंडूत 4 धावा करुन आऊट झाला. मात्र, अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानी फलंदाज सातत्याने बाद होत राहिले.
पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 73 चेंडूत 86 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले.
अब्दुल्ला शफीकने 69 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने 35 चेंडूत 29 धावा केल्या. बाबर आझमने आपल्या खेळीत 3 चौकार मारले.
त्याचवेळी पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 39 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. मोहम्मद हरिस आणि मोहम्मद नवाज अनुक्रमे 3 आणि 12 धावा करुन आऊट झाले.
दुसरीकडे, श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर प्रमोद मदुशनने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय महिष तीक्षणा आणि दुनिथ वेलालागेला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.