ICC टी-२० विश्वचषक स्पर्धा युएईमध्येच: बीसीसीआयची घोषणा

या आधी ही स्पर्धा भारतात होणार होती पण कोरोनाच्या महामारीमुळे भारतात ही स्पर्धा खेळविणे शक्य नसल्याने ही स्पर्धा युएईला हलविण्यात आली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती पीटीआयला दिली.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती पीटीआयला दिली.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) उर्वरीत सामन्यानंतर दोन दिवसांतच २०२१ टी-२० विश्वचषक (T-20 cricket world cup) थरात युएईमध्ये (UAE) रंगणार आहे. १७ ऑक्टोबरपासून विश्वचषकस्पर्धेला सुरुवात होईल. अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीटीआय दिली आहे.

गांगुली म्हणाले, टी -20 वर्ल्डकप संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलविला जाऊ शकतो, अशी माहिती आम्ही आयसीसीला अधिकृतपणे दिली आहे. सर्व भागधारकांच्या आरोग्य सेवेची चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. तसेच ओमानमध्ये पात्रता खेळल्या जातील याची असेही त्यांनी सांगितले.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती पीटीआयला दिली.
WTC Final : पराभवानंतर भारतीय संघाचे निवडकर्ते इंग्लंड - श्रीलंकेत जाणार

या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार असून १४ नोव्हेंबरला याचा अंतिम सामना होणार आहे. या आधी ही स्पर्धा भारतात होणार होती. परंतु कोरोना महामारीमुळे आयसीसीने या स्पर्धेचे ठिकाण बदलले असून ही स्पर्धा आता युएईमध्ये होणार आहे. स्पर्धा युएईला गेली असली तरी याचे यजमान पद भारताकडेच राहू शकते.

कोरोनामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता सप्टेंबरमध्ये पार पडणार असून, त्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषक स्पर्धा युएईतच होणार असल्याने क्रिकेट रसिकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. बीसीसीआय लवकरच आयसीसी टी-२० वर्ल्डकप युएईत होणार असल्याची अधिकृतपणे घोषणा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com