NZ vs PAK: न्यूझीलंडला धक्का! 'या' प्रमुख खेळाडूला कोरोनाची लागण, टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर

Mitchell Santner: न्यूझीलंडचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळला असल्याने त्याला आयसोलेट होण्यास सांगण्यात आले आहे.
New Zealand Cricket Team
New Zealand Cricket TeamTwitter/ICC
Published on
Updated on

Mitchell Santner tested positive for covid:

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंड दौऱ्यावर गेली असून आता या दोन संघात शुक्रवारपासून टी20 मालिकेला सुरवात झाली आहे. या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्याला ऑकलंडला इडन पार्कला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला तगडा झटका बसला आहे. त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटेनरला हा सामना मुकावा लागणार आहे. त्याचे कोविड-19 चे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला हा सामना खेळता आलेला नाही. सध्या त्याला स्वत:हून आयसोलेट होण्यास सांगण्यात आले आहे. याबद्दल न्यूझीलंड क्रिकेटने माहिती दिली आहे.

New Zealand Cricket Team
BAN vs NZ, Video: मस्ती आली अंगाशी! बॉल हातानं आडवल्याने बांगलादेशी विकेटकिपर 'आऊट', वाचा नक्की प्रकरण काय

न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, 'मिचेल सँटेरन आज सकाळी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी मैदानावर येणार नाही. त्याच्यावर पुढील काही दिवसात लक्ष ठेवले जाईल आणि तो हॅमिल्टनला त्याच्या घरी एकटा प्रवास करत जाणार आहे.'

दरम्यान न्यूझीलंड दुसरा टी20 सामना 14 जानेवारीला हॅमिल्टनलाच खेळणार आहे.

सँटेनरकडे गोलंदाजी बरोबरच फलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता आहे, इतकेच नाही, तर त्याने अनेकदा न्यूझीलंड संघाचे प्रभारी कर्णधारपदही सांभाळले आहे. अशात तो न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याचमुळे तो संघातून बाहेर जाणे न्यूझीलंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

New Zealand Cricket Team
NZ-W vs PAK-W: पाकिस्तानने सामना जिंकून रचला इतिहास, न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत केन विलियम्सन न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन -

  • फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, ऍडम मिलने, मॅट हेन्री, टीम साऊदी, इश सोधी, बेन सिअर्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com