GCA Premier League: एमसीसी दणदणीत विजयासह अव्वल

प्रीमियर लीग क्रिकेट ः पणजी जिमखान्यावर 86 धावांनी मात
Keith pinto
Keith pintoDainik Gomantak
Published on
Updated on

GCA Premier League एमसीसी संघाने जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकत ब गटात अव्वल स्थान मिळविले. पर्वरी येथील जीसीए मैदानावर शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी पणजी जिमखान्यावर 86 धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला.

ब गटातून यापूर्वीच दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे गटातील अव्वल स्थान ठरविण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. एमसीसीचे 12, तर पणजी जिमखान्याचे तीन गुण झाले. जीनो क्लब एका गुणांसह उपांत्य फेरीबाहेर राहिला.

सांगे येथील जीसीए मैदानावर साळगावकर क्रिकेट क्लबने चौगुले स्पोर्टस क्लबचा पहिला डाव 312 धावांत गुंडाळून 138 धावांची आघाडी प्राप्त केली. अनिर्णित लढतीत साळगावकर क्लबने तीन गुण प्राप्त केले.

त्यांचे दोन लढतीनंतर सहा गुण झाले. अ गटात धेंपो क्लब सात गुणांसह अव्वल ठरला, तर एका गुणासह चौगुले क्लबचे आव्हान संपुष्टात आले.

संक्षिप्त धावफलक:-

पर्वरी मैदानावर ः एमसीसी, पहिला डाव ः 179 व दुसरा डाव ः 236 वि. वि. पणजी जिमखाना, पहिला डाव ः 161 व दुसरा डाव ः 56.4 षटकांत सर्वबाद 168 (शुभम देसाई नाबाद 44, राजशेखर हरिकांत 28, हेरंब परब 3-16, कीथ पिंटो 7-81).

सांगे मैदानावर ः साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 450 व दुसरा डाव ः 33 षटकांत 4 बाद 70 (आदित्य सूर्यवंशी 33, सचिन मिश्रा 2-20, शिवम आमोणकर 2-24) अनिर्णित वि. चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः 78.3 षटकांत सर्वबाद 312 (समर दुभाषी 51, मोहित रेडकर 41, जगदीश पाटील 28, विजेश प्रभुदेसाई 4-46, यश कसवणकर 3-75).

Keith pinto
Goa Youth Congress: तुमच्या तिजोऱ्या भरायच्या असतील तर भरा, पण नागरिकांच्या जीवाशी खेळू नका

कीथ पिंटोच्या सामन्यात 10 विकेट

पर्वरी येथे एमसीसीचा डावखुरा फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने सामन्यात 10 गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. पणजी जिमखान्याविरुद्ध पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 7 गडी बाद करून त्याने 124 धावांत 10 विकेट मिळविले. त्याने जीनो क्लबविरुद्धही पहिल्या डावात 5 गडी बाद केले होते. आता दोन सामन्यांतून त्याने 12.87च्या सरासरीने 15 गडी बाद केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com