Goa Youth Congress: तुमच्या तिजोऱ्या भरायच्या असतील तर भरा, पण नागरिकांच्या जीवाशी खेळू नका

सरकार जनतेच्या पैशावर हा भोंगळ कारभार करतंय असा आरोप गोवा प्रदेश युथ काँग्रेसवतीने करण्यात आला.
Youth Congress
Youth Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Youth Congress: पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार लोकांच्या पैशाची उधळपट्टी करतंय. रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे मागील काही दिवसात कित्येक अपघात झाले आहेत. अपघातात कित्येकजण गंभीररीत्या जखमी झाले आहे.

पणजीवासीय सध्या बऱ्याच समस्यांना तोंड देत आहेत. सरकार जनतेच्या पैशावर हा भोंगळ कारभार करतंय असा आरोप आज पणजीत गोवा प्रदेश युथ काँग्रेसवतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीतले रस्ते उखडून टाकलेले आहेत. तसेच परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, सांतिनेज परिसरातील चौकाचौकात खोदकाम केल्याने गाड्या पार्क करायला देखील जागा शिल्लक नाही.

रस्त्याने जाताना कधी रस्ता खचेल आणि आपला अपघात होईल अशी भीती नेहमी वाटत राहते. तुम्हाला तुमच्या तिजोऱ्या भरायच्या असतील तर भरा पण नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया युथ काँग्रेसवतीने देण्यात आली.

Youth Congress
Mauvin Godinho: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच प्रशासन तुमच्या दारी उपक्रम

या अगोदर देखील काँग्रेसतर्फे राजधानी पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे विशेष ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच त्यासंबंधीचे निवेदनही महालेखापालांना देण्यात आले होते.

तसेच स्मार्ट सिटीच्या कामकाजावर नगरसेवकांकडूनच टीका करण्यात आली होती. नगरसेवकांनी खोदकामाची आणि आपापल्या प्रभागात आलेली अवकळा दर्शविणारी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकून त्यावर खदखद व्यक्तकेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com