Suryakumar Yadav: 'सूर्याला रोखायचंय तर...', शास्त्रींना उत्तर देताना हेडनने लाईव्ह मॅचमध्ये उडवली खिल्ली

India vs Australia: मॅथ्यू हेडनने सूर्यकुमारच्या वनडेतील कामगिरीबद्दल खिल्ली उडवली.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav
Published on
Updated on

Matthew Hayden trolls Suryakumar Yadav:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभराच्या आतच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव सांभाळत आहे.

सूर्यकुमारने या टी20 मालिकेतील विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतक करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. मात्र, या मालिकेपूर्वी सूर्यकुमारची वनडे वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती. त्याच गोष्टीवरून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने त्याची खिल्ली उडवली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२३ नोव्हेंबर) झाला. या सामन्यादरम्यान मॅथ्यू हेडन आणि भारताचे माजी खेळाडू व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समालोचन केले होते. यादरम्यान एक गमतीशीर किस्सा घडला.

Suryakumar Yadav
IPL 2024: हार्दिकचं होणार मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक! गुजरात टायटन्स 'इतक्या' कोटीत करणार सौदा?

या सामन्यात ताबडतोड फलंदाजी करत असलेल्या सूर्यकुमारला पाहून रवी शास्त्री यांनी हेडनबरोबर समालोचन करत असताना प्रश्न विचारला की सूर्यकुमार यादवला अशा चांगल्या फॉर्ममध्ये असताना कोणी कसं रोखू शकतं?

त्यावर हेडनने उत्तर देताना सूर्यकुमारच्या वनडेतील कामगिरीबद्दल खिल्ली उडवली. हेडनने उत्तर दिले की 'सूर्याला सांगा हा वनडे सामना आहे.'

खरंतर सूर्यकुमारची टी20 क्रिकेटच्या तुलनेत वनडेतील कामगिरी फारशी चांगली नाही. तो टी20 मधील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे, मात्र वनडेत त्याला अशी छाप अद्याप पाडता आलेली नाही.

त्याने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही 7 सामन्यात 17.66 च्या सरासरीने 106 धावा केल्या होत्या. तसेच त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 37 सामन्यांत 25.75 च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह 773 धावा केल्या आहेत.

तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 54 टी20 सामने खेळले असून 46.85 च्या सरासरीने 1921 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचाही समावेश आहे.

Suryakumar Yadav
World Cup: मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर वेंकटेश प्रसादची पोस्ट, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा दाखला देत केलं समर्थन

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमारने 42 चेंडूत 80 धावांची सर्वोच्च खेळी केली.

तसेच ईशान किशनने 58 धावा केल्या. या दोघांमध्ये 112 धावांची भागीदारी देखील झाली, भारताला विजयापर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाची ठरली. भारताने 209 धावांचे आव्हान 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केले.

तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना जॉस इंग्लिसच्या (110) शतकाच्या आणि स्टीव्ह स्मिथच्या (52) अर्धशतकाच्या जोकावर 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com