IPL 2024: हार्दिकचं होणार मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक! गुजरात टायटन्स 'इतक्या' कोटीत करणार सौदा?

Hardik Pandya: हार्दिक पंड्याची आयपीएल 2024 हंगामात मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaIPL

Hardik Pandya set to return in Mumbai Indians and leave Gujarat Titans ahead of IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाचा लिलाव जसजसा जवळ येत आहे, तसे फ्रँचायझींच्या हालचालींना वेग आला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना आपल्या संघातील कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंनी नावे जाहीर करावी लागणार आहेत. त्यामुळे सध्या संघ खेळाडू एकमेकांबरोबर ट्रेड करतानाही दिसून येत आहेत.

याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सबरोबर ट्रेड करणार आहे. हार्दिक गेली 2 वर्षे गुजरातचा कर्णधार होता. तसेच त्यापूर्वी 7 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

इएसपीएनने दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स हार्दिकची सॅलरी आणि अघोषित ट्रान्सफर फी म्हणून गुजरातला 15 कोटी रुपये देणार आहे. जर हे ट्रान्सफर यशस्वी झाले, तर आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात मोठे खेळाडूचे ट्रेडिंग असणार आहे.

तथापि, अद्याप मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स किंवा हार्दिक पंड्या यांच्यापैकी कोणाकडूनही याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Hardik Pandya
World Cup: मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर वेंकटेश प्रसादची पोस्ट, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा दाखला देत केलं समर्थन

दरम्यान, असे असले तरी हार्दिकला पुन्हा संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये तेवढी रक्कम असणे गरजेचे आहे. आयपीएल 2023 लिलावानंतर मुंबईकडे केवळ 0.05 कोटी रुपये उरले होते. तसेच आता पुढच्या लिलावाआधी संघाच्या पर्समध्ये 5 कोटींची भर पडणार आहे.

त्याचमुळे आता हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजायचे असतील, तर मुंबईला काही मोठे खेळाडू लिलावापूर्वी मुक्त करावे लागणार आहेत, जेणेकरून त्यांच्या पर्समध्ये मोठी रक्कम पुन्हा जमा होईल.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली सलग गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच 2022 आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवले होते, तर 2023 आयपीएलमध्ये उपविजेतेपद मिळवले होते.

गेल्या दोन हंगामात हार्दिकने गुजरातसाठी 41.65 च्या सरासरीने 833 धावा केल्या आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत.

Hardik Pandya
World Cup 2023: प्रेक्षकांनी रचला इतिहास! तब्बल 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली फायनल, जय शाह यांची माहिती

गुजरातने आयपीएलमध्ये 2022 मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिकला मुक्त केले होते. त्यामुळे लिलावापूर्वी गुजरातला तीन खेळाडू थेट घेण्याची परवानगी होती.

त्यातून त्यांनी हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि राशिद खानची निवड केली होती. यामध्ये हार्दिक आणि राशिदसाठी त्यांनी प्रत्येकी 15 कोटी रुपये मोजले होते, तर गिलसाठी 7 कोटी रुपये मोजले होते.

मुंबईसाठी हार्दिक होता प्रमुख खेळाडू

हार्दिकला मुंबई इंडियन्सने 2015 साली 10 लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. त्यावेळी तो अनकॅप खेळाडू होता. हार्दिकने मुंबईला 2015, 2017, 2019 आणि 2020 या आयपीएल हंगामांचे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 दरम्यान 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com