Masters Badminton: संध्या, अमित, विशाल, वामन, विल्सनची घोडदौड

अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
Masters Badminton Tournament
Masters Badminton TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत (Masters Badminton) गोव्याच्या संध्या मेलाशीमी, अमित कक्कर, विशाल वेर्णेकर, विल्सन डिसोझा, वामन फळारी यांनी आगेकूच राखली आहे. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये (Manohar Parrikar Indoor Stadium) सुरू आहे.

Masters Badminton Tournament
दिल्लीचा धुव्वा उडवून FC Goa उपांत्य फेरीत

संध्या हिने 35+ वयोगटातील मिश्र दुहेरीत चंडीगडच्या वरूण शर्मा याच्या साथीत खेळताना जी. शिबू व एस. एन. दीपाणा जोडीवर 21-8, 21-8 असा विजय नोंदविला. संध्या-वरुण जोडी 35+ वयोगटातील मिश्र दुहेरीतील अव्वल मानांकित असून सध्याचे राष्ट्रीय विजेते आहेत. पुरुषांच्या 40+ दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना गोव्याच्या अमित कक्कर व विशाल वेर्णेकर जोडीने टी. व्ही. आर. सूर्या राव व चरणजितसिंग ठाकूर जोडीवर चुरशीच्या लढतीत 21-10, 15-21, 21-12 असा विजय प्राप्त केला. या वयोगटातील दुहेरीत गोव्याच्या संदीप व कमलेश या कांजी बंधूंनीही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी संजय गांधी व प्रकाश शर्मा जोडीवर 21-10, 21-9 असा विजय मिळविला.

Masters Badminton Tournament
Goa: एथनचा ऑनलाईन बुद्धिबळातील वरचष्मा कायम

मिश्र दुहेरीतील 45+ वयोगटात डार्विन बार्रेटो व सुप्रिया पै कुचेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठताना ई. व्ही. मुरुकन व आरती पटवर्धन जोडीवर 21-17, 16-21, 21-11 अशी मात केली. 50+ वयोगटात विल्सन डिसोझा व वामन फळारी जोडीने आगेकूच राखली असून त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना पुरुष दुहेरीत कल्लोल गुप्ता व ज्योर्तिमॉय रॉय चौधरी जोडीस 21-5, 21-6 असे हरविले. महिलांच्या 50+ वयोगटात गोव्याच्या मरिना आल्बुकर्क व अविता बांदोडकर जोडीस पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत त्यांना बसंती भट व रश्मी ठकराल जोडीकडून 21-19, 18-21, 21-16 अशी हार स्वीकारावी लागली. 40+ वयोगटातील मिश्र दुहेरीत कमलेश कांजीने शिखा लांबा हिच्या साथीत महेश छाब्रिया व सुजया शेट्टी जोडीस 21-13, 21-15 असे पराजित केले. 45+ वयोगटातील पुरुष एकेरीत गोव्याच्या संदीप कांजी, अशोक गौतम, डॉ. सुनील कवळेकर, आर्नोल्ड रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com