BCCIला मिळाले 'मास्टरकार्ड': आता एका मॅचसाठी मिळणार 3.8 कोटी रुपये

डिजिटल पेमेंट कंपनी PayTmने बीसीसीआयसोबतचा (BCCI) करार मुदतीपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेतला
BCCI
BCCIDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI New Title Sponsor: भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) शीर्षक प्रायोजकत्वात बदल करण्यात आले आहेत. आता पेटीएम (PayTm) भारतीय क्रिकेट संघाचा टायटल स्पॉन्सर असणार नाही. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त (International Matches) आता देशांतर्गत सामन्यांमध्येही शीर्षक प्रायोजक मास्टरकार्ड (Mastercard) असेल. मात्र, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने बीसीसीआयसोबतचा (BCCI) करार मुदतीपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी बीसीसीआयने हा निर्णय मान्य केला आहे. (Mastercard Sponsor BCCI)

BCCI
Neeraj Chopra Injury: भारताच्या आशांना मोठा धक्का, नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

आता मास्टरकार्ड हे टायटल स्पॉन्सर असेल

आता भारतीय संघाच्या सामन्यांदरम्यान मास्टरकार्ड शीर्षक प्रायोजक असेल. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरपूर्वी आपल्या भूमीवर कोणतीही मालिका खेळणार नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेतील तीनही सामने 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान हरारे येथे खेळवले जाणार आहेत. यानंतर, सप्टेंबरमध्ये T20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. आणि या मालिकेचे शीर्षक प्रायोजक मास्टरकार्ड असेल.

BCCI
T20 Rankings: स्मृती- शेफाली वर्मा टॉप-5 मध्ये कायम, मेग लेनिंग ठरली नंबर वन फलंदाज

मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये देणार

खरं तर, असे म्हटले जात आहे की या वर्षी जुलैच्या सुरुवातीला पेटीएमने बीसीसीआयला सांगितले होते की ते यापुढे त्यांच्या सामन्यांचे शीर्षक प्रायोजक म्हणून पुढे जाऊ इच्छित नाहीत. तसेच पेटीएमने हे अधिकार मास्टरकार्डला देण्याचे सांगितले होते. मात्र अहवालानुसार, पेटीएमसोबत झालेल्या कराराच्या आधारे बीसीसीआयने हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. म्हणजेच आता मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये देणार आहे. आणि यापुढे मास्टरकार्ड बीसीसीआयला स्पॉन्सर करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com