Manoj Tiwary: 'धोनीला विचारेल मला का वगळलं, माझ्याकडेही रोहित, विराटसारखी क्षमता...', तिवारीची मनातली खदखद बाहेर

Manoj Tiwary - MS Dhoni: मनोज तिवारीने निवृत्तीनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर भाष्य करताना म्हटले आहे की संघातून वगळण्यामागील कारण तो धोनीला विचारेल.
Manoj Tiwary | MS Dhoni
Manoj Tiwary | MS Dhoni
Published on
Updated on

Manoj Tiwary will ask MS Dhoni Why he was Dropped from India squad after scoring century:

भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने नुकतीच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने बंगालकडून कर्णधार म्हणून बिहारविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये अखेरचा सामना खेळला.

तिवारीने बंगालकडून 2004 साली पदार्पण केले होते. त्यानंतर आता त्याने जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे.

दरम्यान, बंगालसाठी 20 वर्षे क्रिकेट खेळलेल्या तिवारीने भारतासाठी 12 वनडे आणि 3 टी20 सामनेही खेळले आहेत. त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच तो संघातही जागा कधी पक्की करू शकला नव्हता. आता त्याने याबद्दल भाष्य केले आहे.

त्याने म्हटले आहे की खेळाडूचा आत्मविश्वास जेव्हा शिखरावर असतो आणि त्यानंतरही त्याला संधी मिळत नाही, त्यावेळी त्या आत्मविश्वासाला तडा जातो.

Manoj Tiwary | MS Dhoni
IND vs ENG: 'आमच्या संघाकडे कुठेही जिंकण्याची क्षमता...', भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर खेळपट्टीबाबत रोहितचं मोठं भाष्य

दरम्यान, मनोज तिवारीने वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमध्ये 2011 साली वनडेत शतक केले होते. मात्र, त्यानंतर त्याला जवळपास 14 सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर जुलै 2012 मध्ये तो पुढचा सामना खेळला होता. त्यादरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व एमएस धोनी करत होता.

त्यामुळे त्याला याबद्दल मंगळवारी कलकत्ता स्पोर्ट्स जर्नालिस्ट क्लबकडून करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात प्रश्न विचारण्यात होता.

त्यावर तिवारी म्हणाला, 'हो, तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. मला संधी मिळाली, तर मी धोनीला विचारेल की 2011 मध्ये शतक केल्यानंतरही मला प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले. माझ्याकडेही रोहित शर्मा, विराट कोहलीप्रमाणे हिरो होण्याची क्षमता होती, पण मी होऊ शकलो नाही. आता मी जेव्हा टीव्हीवर पाहातो की अनेक लोकांना संधी मिळत आहे, तेव्हा मला वाईट वाटते.'

तिवारीने खेळलेल्या 12 वनडे सामन्यात एका शतकासह 287 धावा केल्या आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Manoj Tiwary | MS Dhoni
Manoj Tiwary: फक्त पाच दिवसातच तिवारीचा यू-टर्न! अचानक निवृत्तीतून माघार, मोठे कारण आले पुढे

दरम्यान, तिवारीने असेही सांगितले की खेळाडू आयपीएल केंद्रित होत असल्याचाही रणजी क्रिकेटला तोटा होत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी कोणतेही कारण न देता रणजी ट्रॉफी बंद करा अशा प्रकारची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याला सामना शुल्काच्या 20 टक्के दंड झाला असल्याचेही त्याने सांगितले.

मनोज तिवारीची कारकिर्द

तिवारीने त्याच्या कारकिर्दीत 148 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 10195 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. तसेच 32 विकेट्स घेतल्या आहेत.

169 लिस्ट ए सामन्यात 6 शतके आणि 40 अर्धशतकांसह 5581 धावा केल्या आहेत. तसेच 63 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 183 टी20 सामन्यांत त्याने 3436 धावा केल्या आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com